राशीभविष्य २९ मार्च | 'या' राशींच्या व्यक्तींचे जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ

असा असेल तुमचा आजचा दिवस

Updated: Mar 29, 2020, 07:11 AM IST
राशीभविष्य २९ मार्च | 'या' राशींच्या व्यक्तींचे जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ

मेष : अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतील. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. पारिवारीक संबंध मधुर होतील. आपली प्रतिमा सुधारण्याची संधी तुम्हाला मिळेल. ठरवलेली कामे पूर्ण होतील. तुमच्यासाठी दिवस उत्साह आणि मनोरंजनाचा असेल. परिवाराशी संबंधित प्रकरणी तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. काही घरगुती प्रकरणांत अडकून राहाल. वैवाहीक आयुष्य सुखाचे असेल. प्रेम वाढेल. जुन्या आजारांपासून थोडा आराम मिळेल. 

वृषभ : व्यवसाय व्यस्त असाल. कार्यक्षेत्रात सन्मान वाढेल. मेहनतीने पैसे कमवाल. कोणतीही गुंतवणूक विचारपूर्वक करा. जी कामे गेल्या काही दिवसांत मागे पडली होती ती पूर्ण कराल. नवे करार करण्याची शक्यता आहे. अनेक क्षेत्रांमध्ये तुम्ही सक्रिय असाल. पुढे जाण्यासाठी तुम्हाला तुमच्यात काही बदल करावे लागतील. अविवाहीत लोकांना रोमांसचे क्षण मिळतील. प्रवासाचे योग आहेत. 

मिथून : घाईघाईमध्ये कोणते काम करु नका. पैशांच्या स्थितीचा अंदाज घ्या. वायफळ खर्च करु नका. नोकरी किंवा व्यवसायामध्ये अडचणी वाढू शकतात. पैशांच्या बाबतीत सतर्क राहा. कामाच्या ठिकाणी तणावाचे वातावरण राहील. आज तुम्ही मित्र किंवा परिवाराच्या मदतीमध्ये अडकून राहाल. पोटाशी संबंधित आजार होण्याची शक्यता आहे. 

कर्क : नोकरीमध्ये अडचणी येऊ शकतात. नेहमीच्या कामांमध्ये जोखिम उचलावी लागू शकते. हट्ट कराल तर कोणाशी तरी वाद होण्याची शक्यता आहे. जास्त विचार करण्यात वेळ घालवू नका. कामामध्ये येणारे अडथळे तुमचा त्रास वाढवू शकतात. दिवस धावपळीचा राहील. काही प्रकरणात लोकांची मदत मिळणार नाही. आरोग्यात चढउतार पाहायला मिळतील. झोप मिळणार नाही. डोकेदुखी आणि डोळ्यात आग होण्याचा त्रास जाणवेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तीची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे.

सिंह : परिवारामध्ये सुखशांती वाढेल. कार्यक्षेत्रात नवे करार होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात सन्मान मिळेल. कोणत्या चांगल्या मित्राशी ओळख होण्याचे योग आहेत. तुमचे लक्ष कोणत्या दुसऱ्या स्थानी जास्त असेल. ऑफिसमध्ये कोणती व्यक्ती गुप्त रितीने तुमची मदत करेल. रोमांसचे क्षण मिळण्याची शक्यता आहे. जोडीदार तुम्हाला आर्थिक मदत करु शकतो. आज तुमचे सहकारी तुमच्यावर प्रभावित होतील. 

कन्या :  व्यवसाय वाढेल. कनिष्ठ वर्गाची मदत मिळेल. तुमची भेट काही खास व्यक्तींशी होईल. नेहमीच्या कामांतून काही वेळासाठी विश्रांती मिळेल. तुमच्या अधिकतर अडचणी संपून जातील. अर्धवट असलेली कामे पूर्ण होतील. मोठ्या लोकांचे सहकार्य मिळाल्याने तुम्हाला फायदा होईल. दिवसभरात दमायला होईल. आराम केला नाहीत तर त्रास होऊ शकतो. 

तूळ : नोकरी किंवा व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्यासाठी दिवस चांगला राहील. विशेष लाभ आणि उन्नतीसाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल. पण तुम्ही त्यामध्येही यशस्वी व्हाल. तुमच्या फायद्याचा विचार नक्की करा. दुसऱ्यांना नाराज न करता चतुराईने काम करा. प्रेमीवर जास्त खर्च करावा लागेल, त्यांच्यावर राग काढू नका. कोणावरही तुमच्या भावना जबरदस्ती लादू नका. 

वृश्चिक : व्यवसायात फायदा कमीच होईल. बदली होण्याचे योग असतील. कोणतेही नवे काम सुरु करु नका. तुमच्यासाठी दिवस थोडा कठीण असेल. कार्यक्षेत्रातील घडामोडी तुमचे स्थान विचलीत करु शकतील. तुमचे मन फालतू कामांमध्ये जास्त राहील. विचार केलेली कामे पूर्ण न झाल्याने तुमचा मूड खराब होईल. अविवाहीत लोकांना प्रेम संबंधामध्ये तणाव येऊ शकतो. जोडीदाराचा मूड ठिक राहणार नाही. 

धनू : रोजची कामे पूर्ण होण्याचा योग आहे. तुमची कामे होत राहतील. विचार करुनच निर्णय घ्या. पैशांच्या स्थितीमध्ये चांगले बदल मिळू शकतील. परिवार, समाजामध्ये तुमचे महत्व वाढेल. प्रेमात यश मिळेल. जोडीदारासोबतचे तुमचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याच्या बाबतीत चढउतार होण्याची शक्यता आहे. जेवणात मसालेदार पदार्थांचा उपयोग करु नका. 

मकर : नवे करार आज नाही केलात तर चांगल असेल. पैसे अडकून राहतील. दिवसाची सुरूवात चांगली नसेल. तुमच्या मनात नसतानाही पैसे खर्च होतील. परिवारातील लोक तुम्हाला कठीण परिस्थितीत टाकतील. आज तुमचे प्लानिंग गुप्त ठेवा. कोणासोबत शेअर करु नका. नात्यांमध्ये तणाव येईल. वाद विवादामध्ये अडकून राहाल. कामामध्ये सुस्तीचे वातावरण राहील. डोके आणि पोट दुखीचे आजार होऊ शकतात. जेवणाची काळजी घ्या. 

कुंभ : आर्थिक चणचण संपून जाईल. कमाई आणि खर्च समान असेल. ऑफिसमध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कार्यक्षेत्रात तुम्ही पूर्ण ताकदीन काम उरकाल. अचानक धन लाभ होईल. चांगल्या लोकांची संगत उपयोगी येईल. मुलांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. प्रयत्नांनी अडचणी सुटतील. 

मीन : आज व्यवसाय नाही वाढवलात तर चांगल ठरेल. जे जसे सुरू आहे तसे सुरू राहुदे. महागड्या वस्तूंची खरेदी करु शकाल. आज तुम्ही कोणता तरी नवा आणि मोठा निर्णय घ्याल. लव लाईफसाठी दिवस चांगला असेल. दमल्याने आणि झोप न आल्याने त्रास होऊ शकतो.