राशीभविष्य २७ मार्च | 'या' राशीच्या व्यक्तींना प्रेमसंबंधासाठी चांगला दिवस

असा असेल तुमचा आजचा दिवस

Updated: Mar 27, 2020, 06:38 AM IST
राशीभविष्य २७ मार्च | 'या' राशीच्या व्यक्तींना प्रेमसंबंधासाठी चांगला दिवस

मेष - पैसा गुंतवणयासाठी एखादी चांगली योजना समोर येऊ शकते. पुरेशा आत्मविश्वासामुळे कामात यश मिळेल. यातले काही व्यवहार आपल्या फायद्याचे असतील. पैसा आणि व्यवसायातील गोष्टीत अधिक लक्ष द्यावे लागेल. सामाजिक सन्मान वाढेल. कौटुंबिक संबंधात सुधारणा होईल. तब्येतीची काळजी घ्या. खर्च वाढू शकतात. 

वृषभ - ऑफिसमध्ये अधिक काम असेल. काही लोक तुमच्याकडून काम करून घेण्याचा प्रयत्न करतील. सावध राहा. मानसिकरित्या मन दुसरीकडे असल्याने कामात लक्ष देणे कठीण जाईल. अधिक विचार करू नका. तुमच्या मनातील गोष्ट जोडीदारापासून लपवू नका. छोट्या समस्या येतील. पैसे कमावण्याचा प्रयत्न कराल.

मिथुन - एक नवी योजना बनवाल. व्यवसाय आणि नोकरीत कुटुंबाची मदत मिळेल. कार्यस्थळी विचार करून बोला. स्वत:वर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न कराल. प्रगतीसाठी नवे मार्ग खुले होतील. व्यवसायात फायदा होण्याचा योग आहे. घरात उपयोगात येईल अशा वस्तूची खरेदी होऊ शकते. सकारात्मक विचार ठेवा. विश्वासू व्यक्तीची मदत मिळू शकते. जोडीदार संवेदनशील  मूडमध्ये असेल. तुमच्या भावनांचा सन्मान होईल. तब्येतीची विशेष काळजी घ्या.

कर्क - नवीन व्यवसायाकडे आकर्षित व्हाल. नोकरीत बदल होण्याचा योग आहे. उत्पन्नात वाढ होईल. एखादी जुन्या योजनेवर काम करण्याचा प्रयत्न कराल. व्यवव्हारकुलशेतमुळे अधिकाऱ्यांकडून सन्मान मिळेल. तब्येतीत सुधारणा होईल. जुन्या आजारांपासून आराम मिळेल. काही नवीन करण्याची इच्छा होईल. जी कामे तुम्ही ठरवली होती ती पूर्ण करण्याची वेळ आहे. 

सिंह - व्यवहारात नवीन योजना आखू शकता. अडकलेले पैसे परत मिळण्याचे योग आहेत. उधारी घ्यावी लागू शकते. तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. ऑफिसमध्ये काही कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल. जोडीदारीची मदत मिळेल. एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. अविवाहितांसाठी दिवस चांगला आहे. विवाह प्रस्ताव येण्याचे योग आहेत. 

कन्या - उदासपणा आणि स्तुतीमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल आणि यात यशस्वी व्हाल. पुढे जाण्याची संधी समोरुन चालून येईल. नोकरी आणि व्यवसायातील निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. वादाचे प्रसंग येऊ शकतात. एखादा जुने भांडण वर येऊ शकते. कुटुंबात समस्या राहतील. मानसिक तणाव वाढेल. वाहन सावधतेने चालवा. 

तुळ - मोठी जबाबदारी मिळेल. मेहनतीने यश मिळेल आणि तुम्ही इतरांचे लक्ष तुमच्याकडे खेचण्यास यशस्वी व्हालं. कर्जफेड होईल. तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत करा. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आज नवीन योजना बनवणे मेहनत करण्यापेक्षाही अधिक प्रभावी ठरेल. परिवार, मित्रमंडळी, नातेवाईक अधिक खास वाटू शकतात. तुमची वागणूक जोडीदाराला खूश करेल. नवीन आणि सकारात्मक काम कराल तर जीवनात चांगले बदल होऊ शकतात. 

वृश्चिक - व्यवसाय चांगला राहील. एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होऊ शकते. योजना बनवलात तर काम लगेच पूर्ण होईल. तब्येत चांगली राहील. भौतिक समस्यांकडे तुमचा कल राहील. व्यक्तिगत समस्या दूर होतील. एखादी गुंतवणूक करण्याची योजना होऊ शकते. अचानक एखादी व्यक्ती किंवा अचानक सुचलेली एखादी गोष्ट फायदेशीर ठरेल. आराम मिळेल.

धनु - नोकरीत बढतीची शक्यता आहे. स्वत:चा व्यवसाय असल्यास त्याकडे लक्ष द्या. व्यवसायासंबंधी समस्या संपुष्टात येतील. धावपळ कमी होईल. दिवस चांगला आहे. घर आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी वातावरण आनंददायी असेल. लव्ह लाईफ आणि वैवाहिक जीवनासाठी दिवस चांगला आहे. थकवा किंवा तणावपूर्ण समस्या होऊ शकते. 

मकर - आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. नवीन ओळखीचा फायदा होईल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. अचानक धनलाभ होऊ शकतो. नोकरीत मनासारखी बदली किंवा बढती होऊ शकते. वैवाहिक जीवन सुखी राहील. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. अति जेवण केल्याने त्रास होऊ शकतो. तब्येतीबाबत सावध राहा.

कुंभ - व्यवसायात आत्मनिर्भरता राहील. नवीन ओळखी होतील. काम वाढेल. कामात सहकाऱ्यांची मदत मिळेल. नवीन लोकांशी संबंध चांगले होतील. बेरोजगारांना रोजगार मिळेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. विचार केलेली कामं वेळेत पूर्ण होतील. जुन्या समस्यांचे निराकरण होईल. हवामान बदलामुळे आजार बळावू शकतो.

मीन - बोलण्यावर नियंत्रण ठेवा. अनियमित दिनचर्येमुळे आळस आणि थकवा वाटेल. काही छोट्या कामात समस्या येतील. उत्पन्नानुसार खर्च करा. आत्मविश्वास नियंत्रणात ठेवा. एखाद्या गोष्टीमुळे बैचेन वाटेल. नवीन गुंतवणूक करू नका. कामात समस्या वाढतील. तब्येत ठीक राहील.