close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आजचे राशिभविष्य | सोमवार | २२ जुलै २०१९

असा असेल तुमचा आजचा दिवस

Updated: Jul 22, 2019, 09:06 AM IST
आजचे राशिभविष्य | सोमवार | २२ जुलै २०१९

मेष- दिवस चांगला असेल. शुभवार्ता ऐकण्यास मिळेल. बेरोजगारांना नोकरीची संधी आहे. आत्मविश्वासामुळे जोखमीची कामेही सहज हाताळाल. सहजपणे काही गोष्टींचा गुंता सुटेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता. चांगली कामं करा, प्रशंसेस पात्र ठराल. पण, या साऱ्याचा फायदा मात्र काही दिवसांनी होईल. 

वृषभ - पैसे कमावण्याच्या नव्या कल्पना असणाऱ्या प्रभावी व्यक्तींशी भेट होईल. इतरांच्या मदतीने तुमच्या अर्थार्जनात वाढ होईल. कामकाजात पुन्हा गती प्राप्त होईल. करिअरमध्ये नव्या संधी मिळतील. साथीदाराकडून मानसिक आधार मिळेल. 

मिथुन- इतरांशी असणारे संपर्क नाती दृढ करा. कार्यालयात खूप काम असेल. काहीजण तुमच्याकडून काम उरकून घेण्याचा प्रयत्न करतील. तन आणि मन या गोष्टींवर लक्ष द्या. व्यवहारात चोख रहा. मजामस्तीच्या वातावरणात काहीतरी नवं शिकण्याची संधी मिळेल. महत्त्वाची कामं थोडी धीराने करा. 

कर्क- नव्या व्यवसायाकडे आकर्षित व्हाल. नोकरी बदलण्याचा विचार कराल. कमाई वाढवाल. काही बाबतीत शांततेने विचार करा. त्यातही मुळापासून विचार करण्याचा प्रयत्न केला तर त्यातून पैसे कमवण्याचे नवे मार्ग सुचतील. नोकरी आणि व्यवसायातील तेथ सुटेल. नव्या संधी मिलतील. व्यवहार कुशलतेमुळे वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल.

सिंह- व्यवसायात नव्या योजना आखाल. अडकलेला पैसा मिळण्याचे योग आहेत. आज कोणतीतरी इच्छा पूर्ण होईल. जवळच्या नात्यांमध्ये चांगल्या बदलांची शक्यता. अनेक समस्यांचं निदान मिळेल. आजूबाजूला घडणाऱ्या धार्मिक आणि राजकीय घटनांचा तुम्हाला फायदा होईल. 

कन्या- नव्या कामास सुरुवात होईल. काही रेंगाळलेली कामही पुन्हा मार्गी लागतील. कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळेल. अधिक कष्ट घ्या त्याचा फायदाच होणार आहे. अडकलेले व्यवहार मार्गी लागतील. शहराबाहेर जाण्याचे बेत होतील. वाहन खरेदीचाही बेत आखाल. नवं घर किंवा भूखंड खरेदी करायचा बेत आखलात तर त्याचाही फायदा होईल. 

तुळ- कर्जापासून मुक्ती मिळेल. स्वत:च्या कामावर पूर्ण लक्ष्य ठेवा. नवं शिकण्याची संधी मिळेल. सोबतच नव्या आव्हानांना तोंड देण्याचीही संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी कनिष्टांचं सहकार्य लाभेल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. हळहळू गोष्टी पुन्हा पूर्वपदावर येतील. 

वृश्चिक- जबाबदारी वाठेल. धार्मिक आणि सामाजिक कामांसाठी वेळ काढाल. कुटुंबासोबत काही खास क्षण व्यतीत कराल. धीर ठेवा, अडचणी दूर होतील. व्यवसाय आणि कामाच्या ठिकाणी यश मिळेल.  विद्यार्थांमध्ये आनंदाचं वातावरण असेल. 

धनू- नोकरीमध्ये पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. स्वत:चा काही व्यवसाय असेल तर त्याकडे सर्व लक्ष्य केंद्रीत होईल. नवं घर किंवा भूखंडाविषयीची कामं मार्गी लागतील. नव्या लोकांशी भेट होईल. बऱ्याच दिवसांपासून अडकलेले बेत पुन्हा मार्गी लागतील. 

मकर- नव्या संधी मिळतील. राशीत चंद्र असल्यामुळे नव्या कामांना सुरुवात होईल. नकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष करा. काही अडचणींचा सामना करावा लागेल. विवाहप्रस्ताव येतील. व्यवसायात काही महत्त्वाचे बदल करण्याची निर्णय घ्याल. 

कुंभ- संपूर्ण लक्ष हे संतान आणि शिक्षणावर असेल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवलात तर, दिवस चांगला जाईल. येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला नव्या संधी मिळतील. बेत आखा आणि योग्य वेळ येण्याची वाट पाहा. बोलताना जरा जपून. आजूबाजूच्या किंवा सोबत असणाऱ्या व्यक्ती तुमच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू शकतील. साथीदारासोबत मतभेद होऊ शकतात. 

मीन- आज तुम्ही तुमच्या बोलण्यावर ताबा ठेवा. प्रेमी किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना तुमची गरज आहे, अशा व्यक्तींशी भेट होईल. इतरांची मदत कराल. एखादी परिस्थिती तुमचा दृष्टीकोन बदलेल.