आजचे राशिभविष्य | बुधवार | 25 सप्टेंबर 2019

असा असेल तुमचा आजचा दिवस

Updated: Sep 25, 2019, 08:06 AM IST
आजचे राशिभविष्य | बुधवार | 25 सप्टेंबर 2019

मेष - निर्णय घेताना थोडे सतर्क राहा. फायद्यात राहाल. आर्थिक अडचणी दूर करण्याची तुमच्याकडे क्षमता आहे. नवीन अनुभव येतील. वेगवेगळ्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न कराल आणि त्यात यश मिळण्याची शक्यता. स्वतःचा मुद्दा स्पष्टपणे मांडा. दुसऱ्यांचा मुद्दाही व्यवस्थितपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा. 

वृषभ - आज तुम्ही नव्या कामास सुरुवात कराल. तुमच्यावर टीका होण्याचीही शक्यता आहे. पण हे तुमच्यासाठी फायदेशीरच असेल. पैशांशी संबंधित काही मुद्द्यांकडे लक्ष द्या. सर्व प्रकारच्या आव्हानांसाठी तयार राहा. नवीन मुद्दे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. एखाद्याला महत्त्वाच्या प्रकरणात तुम्ही उपयुक्त सल्ला द्याल. जुन्या नुकसानाची भरपाई मिळेल.

मिथुन - तुमच्या भावना नियंत्रणात ठेवा. स्वतः तयार केलेल्या योजनांवर विश्वास ठेवा. पैशांच्या प्रकरणात लक्षवेधक ऑफर मिळू शकते. त्यावर गंभीरपणे विचार करा. करिअर, संपर्क आणि स्वतःची प्रतिमा यासाठी चांगला दिवस. स्वतःच्या जबाबदाऱ्या आणि महत्त्वाचे काम पूर्ण करा. कुणाकडून येणी असतील, तर ती आज मिळतील.

कर्क - लोकांशी संपर्क वाढविण्याच्या दृष्टीने चांगला दिवस. करिअरबद्दलच्या संकल्पना अधिक स्पष्ट होतील. स्वतःच्या कार्यक्षेत्राशी जोडलेले एखादे गुपित तुम्हाला समजेल. तुमचा प्रस्ताव जास्तीत जास्त लोक मान्य करतील. स्वतःचे काम आणि जबाबदाऱ्या यांच्याकडे लक्ष द्या. कामकाज आणि करिअरसंदर्भात अनेक नव्या गोष्टी समजतील.

सिंह - आपल्या क्षेत्रात इतरांपेक्षा पुढे जाण्यासाठी तुम्ही उत्साहित असाल. कामात कितीही व्यग्र असला, तरी कुटुंबीयांशी फोनवरून संपर्कात राहा. काही महत्त्वपूर्ण प्रकरणात लक्षवेधक प्रगती होण्याची शक्यता. पैसे कमाविण्याची एखादी संधीही मिळू शकते. अधिकचे उत्पन्न मिळू शकते. 

कन्या - आजचा दिवस एकदम छान जाईल. पैशांची चणचण संपण्याची शक्यता आहे. एखाद्या खास व्यक्तीकडून महत्त्वाचा सल्ला मिळू शकतो. आपल्या कार्यक्षेत्रात अधिक सक्रिय राहाल. अनेक प्रकरणे सहज सुटू शकतात. एखाद्या विश्वासू व्यक्तीबरोबर मन की बात जरूर शेअर करा. 

तूळ - एखादे खास काम करण्यासाठी तुम्ही उत्साहित असाल. नवीन अनुभव मिळतील. व्यावसायिक लोकांशी संपर्क होण्याची शक्यता आहे. भविष्यात त्यांचा तुम्हाला फायदा होईल. व्यावसायिक प्रकरणात एखादा व्यवहार करण्याचे ठरवत असाल, तर तुमचा दिवस चांगला जाईल. तुमचा मुद्दा इतरांना व्यवस्थितपणे समजून सांगू शकाल.

वृश्चिक - अनेक गोष्टी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी तुम्हाला मदत मिळू शकते. नवीन माहिती मिळेल. तुमच्याकडे प्रत्येक मुद्द्याचे उत्तर असू शकते. एकट्यानेच सगळे काम करण्याची इच्छा तुमच्यामध्ये निर्माण होऊ शकते. लोक तुमच्यामुळे प्रभावित होऊ शकतात. पैशांशी जोडलेले काही नवीन संधी तुम्हाला मिळू शकतात. 

धनु - अनेक गोष्टी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी तुम्हाला मदत मिळू शकते. नवीन माहिती मिळेल. तुमच्याकडे प्रत्येक मुद्द्याचे उत्तर असू शकते. एकट्यानेच सगळे काम करण्याची इच्छा तुमच्यामध्ये निर्माण होऊ शकते. लोक तुमच्यामुळे प्रभावित होऊ शकतात. 

मकर - वेळ मिळाला तर थोडा आराम करा. एखाद्या प्रकल्पावर तुम्ही काम करत असाल, तर पैशांची स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. जीवनसाथीसाठी एखादे छोटे-मोठे गिफ्ट घेऊ शकाल. वैयक्तिक समस्या सोडविण्यातही यश मिळेल. थोडा विचार केला तर सर्व प्रश्न सुटतील. लोकांशी चर्चा केली तर नवीन पर्याय तुमच्यासमोर येऊ शकतो. 

कुंभ - एखादे कायदेशीर प्रकरण असेल तर त्या संदर्भात गोड बातमी मिळू शकते. मित्रांसोबत काम करण्यासाठी योजना आखू शकता. लोकांशी संपर्क वाढेल. गोचर कुंडलीमध्ये कर्म भावात चंद्र असल्याने सफलता मिळण्याचे योग आहेत. लवकरच तुम्हाला एखादी यात्रा करण्याची संधी मिळू शकते. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो. 

मीन - आपले विचार स्पष्टपणे मांडा. व्यवसायात लोक तुमच्या मुद्द्याशी सहमती दर्शवून तो मान्यही करतील. ऑफिस आणि व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर आजचा दिवस यशस्वी ठरण्याची शक्यता. जर प्रयत्न केले तर एखाद्या खास व्यक्तीला प्रभावित करण्यात यशस्वी ठराल. एखाद्या विश्वासू मित्राची मदत घेऊन एखादे काम करा. आत्मविश्वास वाढू शकतो.