मेष - आज कामासोबत जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. दिवसभर व्यस्त राहाल. व्यवसायातील कामं समजुतीने करा. यश मिळेल. ऑफिसमध्ये शांती राहील. प्रवासाचा कार्यक्रम होऊ शकतो.
वृषभ - जुन्या समस्या मार्गी लागण्याची शक्यता आहे. स्वत:कडे लक्ष द्या. नवीन कपड्याची खरेदी होऊ शकते. सक्रिय राहाल. उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ ठेवावा लागेल. मित्रांची मदत मिळू शकते.
मिथुन - धनलाभाची शक्यता आहे. अधिक काळ चालणाऱ्या कामचा फायदा होऊ शकतो. आज काही योजना आखू शकता. अविवाहितांचे विवाह जमू शकतात. स्वत:च्या बुद्धीने कामं पूर्ण कराल. मित्र, कुटुंबाची मदत मिळेल. चांगली बातमी मिळू शकते. बेरोजगार लोकांसाठी दिवस चांगला आहे.
कर्क - रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. पैशांसंबंधी गोष्टी मार्गी लागू शकतात. समस्या सोडवण्यासाठी मित्रांची मदत होऊ शकते. कामासंबंधी चांगले विचार, कल्पना मनात येतील. समजूतीने काम कराल तर, अधिक गोष्टी सोडवू शकाल.
सिंह - आर्थिकस्थितीत काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. ज्याचा फायदा होईल. तुमच्या अपेक्षा नियंत्रणात ठेवा. कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. ऑफिसमधील तणाव कमी होऊ शकतो.
कन्या - कामात नवीन प्रयोग केल्यास फायद्याची शक्यता आहे. दिवस चांगला आहे. जो विचार कराल, त्यात यश मिळू शकते. जोडीदारासोबत वेळ जाईल. कुटुंबातील समस्या सोडवल्या जातील.
तुळ - विचार करत असलेली कामं पूर्ण करण्यास घ्या. फायदा होईल. दिवसभर आज मन प्रसन्न राहील. सामाजिक कामांसाठी दिवस चांगला आहे. मित्रांसोबत वेळ जाईल. गुंतवणूकीसाठी दिवस चांगला आहे.
वृश्चिक - दिवस खास आहे. अचानक काही गोष्टीं समोर येतील ज्याने फायदा होण्याची शक्यता आहे. तुमच्या समजूतदारपणाचा वापर करा. दिवस शुभ आहे. नवीन व्यवहार सुरु केल्यास फायद्याचा ठरु शकतो. तब्येत ठीक राहील.
धनु - नोकरी, करियर, पैशांच्या बाबतीत दिवस चांगला आहे. नवीन नोकरी किंवा प्रमोशनच्या प्रयत्नांत असाल तर, प्रयत्न सफल होऊ शकतात. नवीन लोकांशी ओळखी होऊ शकतात.
मकर - महत्त्वाचं काम आज करु शकता. संपूर्ण मेहनतीनंतरच कामाचा मोबदला मिळण्याची शक्यता आहे. जुनी कामं संपवण्याचा प्रयत्न करा. अविवाहितांसाठी दिवस चांगला आहे.
कुंभ - संयम आणि धीराने काम करा. दिवसभर पैशांच्या बाबतीत विचार कराल. दररोजची कामं अधिक असतील. तब्येतीच्या तक्रारी कमी होतील.
मीन - केलेल्या कामाचा फायदा होऊ शकतो. त्यातून पैशांच्या समस्या मार्गी लावू शकता. कागदोपत्री कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. प्रवासासाठी दिवस चांगला आहे.