आजचे राशीभविष्य | १४ नोव्हेंबर २०१९ | गुरुवार

कसा आहे तुमचा आजचा दिवस?

Updated: Nov 14, 2019, 07:58 AM IST
आजचे राशीभविष्य | १४ नोव्हेंबर २०१९ | गुरुवार

मेष - समस्या सोडवल्या जावू शकतात. अचानक फायदा होऊ शकतो. कामात मन लागेल. सकारात्मक राहा. मनात येईल ते बोलण्याचा प्रयत्न करा. परंतु बोलण्याआधी विचार करा. पैशांसंबंधी गोष्टी सुधारु शकतात. 

वृषभ - चंचलता राहील. आईचं प्रेम मिळेल. वेळेसोबत सर्वकाही ठीक होईल. मित्रांसोबत वेळ घालवाल. रखडलेली कामं जोडीदाराच्या मदतीने पूर्ण होतील. तुमच्या भावना व्यक्त कराल. मनात येईल ते करण्याचा प्रयत्न करा. 

मिथुन - मित्र आणि भावंडांचं सहकार्य मिळेल. अचानक एखादं खास काम करावं लागू शकतं. आज अशीच कामं करा जी लवकर पूर्ण होतील. आज घेतले जाणारे अधिकतर निर्णय तुमच्या फेवरमध्ये असतील. कुटुंबाच्या गरजा आणि कामांसाठी अधिक वेळ द्यावा लागेल. अधिकारी तुमच्यावर खुश राहतील.

कर्क - उत्साही राहाल. अनेक जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त राहाल. व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करा. रखडलेलं काम पूर्ण होवू शकतं. मुलांची मदत होईल. विवाह प्रस्ताव येऊ शकतात. नोकरदार आणि व्यावसायिकांना नवीन उत्पनाच्या संधी उपलब्ध होतील.

सिंह - केलेल्या कामाचा परिणाम मिळू शकतो. नवीन प्रेमसंबंध सुरु होण्याची शक्यता आहे. पैशांसंबंधी अनेक योजना मनात सुरु राहतील. जुन्या मित्राची भेट होण्याचा योग आहे. नवीन नोकरीची संधी आहे. कामासाठी प्रवास करावा लागू शकतो.

कन्या - व्यवसायात प्रगतीचे योग आहेत. महत्वाकांक्षी राहाल. जवळपासच्या लोकांची खास कामासाठी गरज लागू शकते. प्रवासाचा योग आहे. कामात येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात. चांगले अनुभव येतील.

तुळ - कुटुंब आणि पैशांच्या बाबतीत लक्ष राहील. प्रत्येक गोष्टीचा फायदा करण्याचा प्रयत्न करा. कामं वेळेत पूर्ण होतील. कामात व्यस्त राहाल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. आई-वडिल, भावंडांची मदत होऊ शकते.

वृश्चिक - कामात लक्ष द्या. नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. प्रसन्न राहाल. सर्वांसोबत प्रेमपूर्ण व्यवहार राहील. जवळपासच्या लोकांची मदत मिळू शकते. 

धनु - दिवस चांगला आहे. प्रियजनांवर खर्च करु शकता. कामं यशस्वी होतील. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. 

मकर - भावनात्मक समस्या सुटू शकतात. अनेक दिवसांपासून असलेला ताण कमी होऊ शकतो. नवीन जबाबदारी मिळू शकते. अचानक निर्णय घ्यावे लागू शकतात. 

  

कुंभ - आनंदी वार्ता मिळू शकते. राहिलेली कामं पूर्ण करा. सामाजिक कामात यश मिळेल. खास लोकांशी संबंध अधिक दृढ होतील. 

मीन - पुढे जाण्यासाठी संधी मिळेल. पैशांबाबतीत प्रत्येक गोष्टींवर बारकाईने विचार करा. सकारात्मक राहा. महत्त्वाची कामं पूर्ण होतील. आत्मविश्वास राहील. नवीन लोकांशी ओळखी, भेट होवू शकते.