आजचे राशीभविष्य | १६ नोव्हेंबर २०१९ | शनिवार

कसा आहे तुमचा आजचा दिवस?

Updated: Nov 16, 2019, 08:00 AM IST
आजचे राशीभविष्य | १६ नोव्हेंबर २०१९ | शनिवार title=

मेष - जुन्या गोष्टी पुन्हा वर येऊ शकतात. सावध राहा. व्यापारात चढ उतार येऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीचा योग आहे. कामाच्या निमित्ताने प्रवासयोग असण्याची शक्यता आहे. घाई- गडबड होऊ शकते. अडकलेली कामं पूर्ण होतील. 

वृषभ - आज दररोजच्या कामांमधून वेळ काढून काही इतर गोष्टींवरही लक्ष द्या. आनंदी राहा. आज तुम्ही भावनिक असाल. पण, भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. खाण्यापिण्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. 

मिथुन - व्यापाराच्या नव्या संधी मिळतील. नोकरीच्या ठिकाणी यश मिळण्याची संधी आहे. नवीन वस्तू खरेदी करु शकता. शुभवार्ता कळू शकेल. आज सुरु केलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

कर्क - आज तुमचे आचार-विचार कामांत वापरा. प्रयत्नांना यश मिळेल. कुटुंब आणि मित्रांकडून सहकार्य मिळेल. इतरांशी असणारं नातं आणखी दृढ होईल. काही कामं पूर्ण होतील. साथीदारासोबत बाहेर जाण्याचे योग आहेत. 

सिंह - जवळच्या लोकांबाबत चांगली बातमी मिळेल. दिवस आनंदात जाईल. जबाबदारी वाढू शकते. तब्येतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

कन्या - इतरांबद्दल अधिक विचार करु नका. नव्या विचारांनी काम करा. ताण घेऊ नका. जोडीदाराच्या भावना समजण्याचा प्रयत्न करा. कामासाठी मेहनत घ्यावी लागेल.

तुळ - कामासाठी प्रवास होऊ शकतो. आर्थिक परिस्थिती सुधारु शकते. आज काही कामांच्या बाबतीत यश मिळण्याची शक्यता आहे. सावध राहा. नोकरी- व्यापाराच्या दृष्टीने दिवस आव्हानात्मक असेल. स्वत:वर जास्त लक्ष द्या. 

वृश्चिक - आत्मविश्वास ठेवा. कोणत्याही कामाचा ताण घेऊ नका. अडचणींची कामं पूर्ण कराल. कोणाच्याही विरोधात जाऊ नका. काही कामं इच्छेविरुद्ध करावी लागतील. साथीदाराचं सहकार्य मिळेल. 

धनु - दिवस चांगला आहे. आनंदी राहाल. काही लोकांना तुमच्याबाबत द्वेष वाटू शकतो. कोणत्याही बाबतीत हट्ट करु नका. आरोग्याची काळजी घ्या. जे मनात येईल त्या गोष्टींकडे लक्ष द्या.

मकर - जुन्या गोष्टींपासून लांब जाण्याचा प्रयत्न करा. काही गोष्टींसाठी स्वत:ला दोषी ठरवू नका. तुमच्या आवडीच्या लोकांशी बोलू शकता. दिवस सामान्य आहे.

  

कुंभ - धनलाभ होण्याची शक्यता आहे. नवी जबाबदारी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत घ्यावी लागेल. 

मीन - गुंतवणूक करताना सावध राहा. अनेक दिवसांपासून रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. तब्येतीची काळजी घ्या.