आजचे राशीभविष्य | १७ नोव्हेंबर २०१९ | रविवार

कसा आहे तुमचा आजचा दिवस?

Updated: Nov 17, 2019, 08:23 AM IST
आजचे राशीभविष्य | १७ नोव्हेंबर २०१९ | रविवार

मेष - मित्र आणि भावंडांची साथ मिळेल. नवीन कामाची सुरुवात होऊ शकते. व्यवहारात यश मिळण्याची शक्यता आहे. दिवस कुटुंबासोबत घालवू शकता. जबाबदारीकडे लक्ष द्या. जोडीदारासाठी वेळ काढा. 

वृषभ - नकारात्मक कामात अडकल्यास महत्त्वाची संधी घालवू शकता. आज कोणताही निर्णय घेऊ नका. सावध राहा. विचार करुन बोला. वाहन चालवताना सावध राहा.

मिथुन - नवीन काम मिळू शकते. समस्या सोडवण्यासाठी दिवस चांगला आहे. विचार करत असलेल्या कामाची सुरुवात करा. महत्त्वपूर्ण कामांसाठी दिवस चांगला आहे. 

कर्क - प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज होऊ शकतात. कोणत्याही बाबतीत हलगर्जीपणा करु नका. विचारात असलेली कामं पूर्ण होण्यास वेळ लागू शकतो. अधिक मेहनत घ्यावी लागेल. तब्येतीची काळजी घ्या.

सिंह - अनेक विचार मनात येतील. पैसे सांभाळून ठेवा. गुंतवणूक करताना सांभाळून करा. कामात मन न लागल्याने समस्या वाढू शकतात. तब्येत चांगली राहील. 

कन्या - व्यवसायात नवीन योजनांवर काम सुरु होऊ शकते. जोडीदाराची साथ मिळेल. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. अचानक काही कल्पना मनात येऊ शकतात. कामाकडे लक्ष द्या. तब्येत चांगली राहील. मन प्रसन्न राहील.

तुळ - दिवस चांगला आहे. परिस्थितीचा फायदा घेऊन काम पूर्ण करु शकता. तब्येत चांगली राहील. चांगल्या संधी मिळू शकतात. अचानक मनात आलेले विचार फायदेशीर ठरु शकतात. जोडीदारासोबत संबंध दृढ होतील. 

वृश्चिक - नोकरी, व्यवसायात अचानक निर्णय घ्यावे लागू शकतात. नुकसान होण्याची शक्यता आहे. गोंधळून जाल. वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे. समस्या वाढवणारे लोक जवळपास राहतील. तब्येतीची काळजी घ्या.

धनु - आर्थिक प्रश्न सुटू शकतात. वैवाहिक जीवन चांगले राहील. समजूतीने समस्या सोडवा. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नवीन लोकांशी ओळखी होतील. 

मकर - दिवसभर सावध राहा. काही लोक स्वत:च्या स्वार्थासाठी तुमच्या समस्या वाढवण्याचा प्रयत्न करु शकतात. मनात अनेक विचार सुरु राहतील. कामात मन लागणार नाही. आज कोणतंही महत्त्वाचं काम हाती घेऊ नका. 

  

कुंभ - पदोन्नतीचा योग आहे. योजना यशस्वी होऊ शकतात. पुढील कामांसाठी योजना आखू शकता. रखडलेली कामं पूर्ण होण्यासाठी दिवस चांगला आहे. 

मीन - व्यवसायात काही नवीन करण्याच्या नादात समस्या वाढू शकतात. मनात अनेक गोष्टी सुरु असल्याने कामात मन लागणार नाही. व्यावसायिक समस्या वाढू शकतात. कोणत्याही कामाचा रिझल्ट न मिळाल्यास टेन्शन घेऊ नका. तब्येतीची काळजी घ्या. जेवण वेळेत करा.