आजचे राशिभविष्य | सोमवार | २८ ऑक्टोबर २०१९

कसा असेल तुमचा आजचा दिवस 

Updated: Oct 28, 2019, 09:40 AM IST
आजचे राशिभविष्य | सोमवार | २८ ऑक्टोबर २०१९ title=
संग्रहित फोटो

मेष - तुमच्यासाठी वेळ चांगला आहे. पैशांसंबंधी गोष्टींकडे लक्ष द्या. आव्हानांसाठी तयार राहा. नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्साही राहाल. एखाद्या गोष्टीसाठी तुमचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. मित्र, भावंडं आणि सोबत काम करणाऱ्यांची मदत होईल.

वृषभ - काही नवीन अनुभव येऊ शकतात. समस्या सोडवण्याचा प्रयत्न कराल, त्यात यशस्वी व्हाल. तुमची मतं स्पष्टपणे मांडा. दुसऱ्यांच्या गोष्टी समजून घेण्याच्या प्रयत्न करा. कौटुंबिक संबंध सुधारण्यासाठी दिवस चांगला आहे.

मिथुन - कितीही व्यस्त असाल तरी कुटुंबातील व्यक्तींसोबत संपर्कात राहा. महत्त्वपूर्ण गोष्टींमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. पैसे कमावण्याच्या नव्या संधी मिळू शकतात. 

कर्क - लोकांशी चांगले संबंध निर्माण होऊ शकतात. तुमचं काम आणि जबाबदारी पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. जवळच्या लोकांशी संबंध अधिक घट्ट होऊ शकतात. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे.

सिंह - दिवस चांगला आहे. पैशांसंबंधी समस्या सुटू शकतात. खास व्यक्तीचा सल्ला किंवा मदत मिळण्याची शक्यता आहे. विश्वासू व्यक्तीशी तुमच्या मनातील गोष्ट शेयर करु शकता. कामं वेळेत पूर्ण होतील. 

कन्या - स्वत:च्या योजनांवर विश्वास ठेवा. पैशांबाबतीत महत्त्वाच्या ऑफर मिळू शकतात. त्यावर गंभीरतेने विचार करा. विद्यार्थ्यांना यश मिळेल. महिलांसाठी दिवस शुभ आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे.

तुळ - आत्मविश्वास राहील. लोक तुमच्यावर प्रभावित होऊ शकतात. अनेक गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याचा फायदा होईल. 

वृश्चिक - एखाद्या योजनेवर काम करण्याचा प्रयत्न करत असाल तर पैशांच्या स्थितीत सुधारणा होईल. विचार करुन बोला. नवीन कामासाठी दिवस चांगला आहे. व्यवसायात फायदा होईल. 

धनु - एखाद्या खास कामाबद्दल उत्साही राहाल. व्यवसायासाठी दिवस चांगला आहे. दुसऱ्याचं म्हणणं समजण्याचा प्रयत्न करा. अनेक दिवसांपासून विचार करत असलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे.

मकर - कामासंबंधी नवीन माहिती मिळेल. पैशासंबंधी नवीन मार्ग मिळू शकतात. नव्या संधी मिळू शकतात. त्याचा फायदा करण्याचा प्रयत्न करा.

  

कुंभ - तुमचे विचार स्पष्टपणे मांडा. कामात लोक तुमच्या मतांशी सहमत असतील. विश्वासू व्यक्तीचीच मदत घ्या. एखाद्यासोबत अचानक झालेली भेट प्रेमसंबंधांची सुरुवात ठरु शकते. आत्मविश्वास वाढेल.

मीन - मित्रांसोबत कामसंबंधी योजना आखू शकता. लोकांशी ओळख होण्याची शक्यता आहे. प्रवास करावा लागू शकतो. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे.