Mahashivratri 2024 : ...म्हणून शिवलिंगाला घालत नसतात पूर्ण प्रदक्षिणा, शास्त्र काय सांगतं?

Mahashivratri 2024 : आपण मंदिरात गेल्यावर देवाचं दर्शन घेतल्यानंतर प्रदक्षिणा मारतो. पण शिवलिंगाला आपण अर्ध प्रदक्षिणा मारतात हे तुम्हाला माहिती आहे का? त्यामागील कारणं आणि नियम काय आहे त्याबद्दल जाणून घेऊयात. 

नेहा चौधरी | Updated: Feb 28, 2024, 09:58 AM IST
Mahashivratri 2024 : ...म्हणून शिवलिंगाला घालत नसतात पूर्ण प्रदक्षिणा, शास्त्र काय सांगतं?  title=
Mahashivratri 2024 so Shivlinga is not worn full circle what does scripture pradakshina rules types temple ritual in marathi

Mahashivratri 2024 : भारत हा वैविध्यतेने नटलेला देश आहे. इथे कानाकोपऱ्या मंदिर असतात. प्रत्येक मंदिरामागे आपली आख्यायिका आणि इतिहास आहे. हिंदू धर्मात पूजा, उत्सव आणि सणाला अन्यय साधारण महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात व्रत, सण असतात. मार्च महिन्यामध्ये येणाऱ्या महाशिवरात्रीचा उत्साह अख्खा देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. आपण मंदिरात गेल्यावर देवाचं दर्शन घेतल्यानंतर प्रदक्षिणा मारतो. पण तुम्हाला माहिती आहे की, महादेवाच्या मंदिरात पूर्ण प्रदक्षिणा घालण्यास बंदी आहे. तुम्ही पाहू शकता की, अनेक शंकर मंदिरात पूर्ण गोल प्रदक्षिणा घालू नका अशी सूचना लिहलेली असते. त्याशिवाय काही मंदिरात प्रदक्षिणा मार्ग हा मध्येच बंद केलेला असतो. यामागील कारण काय आणि हा नियम फक्त शिवमंदिरात का असतो याबद्दल जाणून घेऊयात. (Mahashivratri 2024 so Shivlinga is not worn full circle what does scripture pradakshina rules types temple ritual in marathi)

...म्हणून शिवलिंगाला घालत नसतात पूर्ण प्रदक्षिणा!

शिवलिंगा असलेल्या शिव निर्माल्य ओलांडू नये, असं धार्मिक शास्त्रात सांगण्यात आलं आहे. असं म्हणतात की, शिव निर्माल्य ओलांडल्याने मानव शक्तिहीन होतो. निर्मली याला जलधारी किंवा सोमसूत्र असंही म्हटलं जातं. शास्त्रानुसार सोमसूत्रात असलेली ऊर्जा ही अतिशय गरम आणि शक्तिशाली असते. 

जेव्हा शिवलिंगावर अभिषेक करण्यात येतो, जल, दूधाने अभिषेक घातला जातो तेव्हा जलधारीतून तो बाहेर पडताना ऊर्जा त्यात विलीन होते. ही ऊर्जा आपल्यासाठी शरीरासाठी चांगली नसते. असं म्हणतात जर आपण सोमसूत्र पायाने ओलांडल्यास ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करतो. त्याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर होतो, धर्मशास्त्रात सांगण्यात आलंय. 

प्रदक्षिणा का घालतात? 

मंदिरात देवदर्शन घेतल्यानंतर आपली पावलं आपसुक प्रदक्षिणेच्या मार्गाकडे वळतात. जेव्हा आपण देवासमोर उभं राहतो तेव्हा एका सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह आपल्याला जाणवतो. अशावेळी मूर्तीच्या कक्षेतील हीच भर्जा ग्रहण करण्यासाठी प्रदक्षिणा घातली जाते, असं धार्मिक शास्त्रात सांगण्यात आलंय. शिवाय धार्मिक शास्त्रात असं सांगितलं आहे की, प्रदक्षिणा ही तपाचरण म्हणजे देवतेच्या आराधनेचा एक भाग आहे. देवाचं नामस्मरण करत उजव्या बाजूने प्रदक्षिणा घातली जाते. 

प्रदक्षिणेचे प्रकार किती?

देव प्रदक्षिणा : मंदिरात गाभाऱ्याभोवती मंत्र किंवा अन्य स्तोत्र, नामस्मरण करत जी प्रदक्षिणा घातली जाते त्याला देव प्रदक्षिणा म्हणतात. 

मंदिर प्रदक्षिणा : राज्यातील काही मंदिरात गाभाऱ्याभोवती नाही तर मंदिराभोवती प्रदक्षिणा मार्ग असतो. त्याला मंदिरप्रदक्षिणा असं म्हणतात. 

क्षेत्रप्रदक्षिणा : या प्रदक्षिणामध्ये लघुपरिक्रमा आणि दीर्घ परिक्रमा असं प्रकार असून लघुपरिक्रमेत आपल्या परिसरातील, गावातील, शहरातील तीर्थकुंडे, देवस्थाने, क्षेत्रपाल मंदिरांचा समावेश आहे. तर दीर्घपरिक्रमेत पंचक्रोशीतील देवस्थानांचा, तीर्थस्थानांचा समावेश करण्यात येतो. त्याला क्षेत्रप्रदक्षिणा असं म्हटलं जातं. 

नदी प्रदक्षिणा : नदी प्रदक्षिणा ही केवळ पायीच करायची असतं असं शास्त्रात सांगण्यात आलंय. नदी परिक्रमेत नदीत स्नान करणे, नदीचे पाणी पिणे, माधुकरी मागून जेवणे, हे नियम आहेत. नदी प्रदक्षिणासाठी नर्मदा, कृष्णा, गोदावरी, तुंगभद्रा या नद्यांच्या समावेश होतो. 

वृक्ष प्रदक्षिणा :

वृक्षप्रदक्षिणेत प्रामुख्याने वड, अश्वत्थ (पिंपळ), औदुंबर, तुळशी यांना प्रदक्षिणा घातल्यामुळे पुण्य प्राप्त होते असं मान्यता आहे. तर काही ठिकाणी गिरी म्हणजे पर्वत प्रदक्षिणाही घातली जाते. 

प्रदक्षिणा नियम 

धार्मिक शास्त्रात प्रदक्षिणा घालण्यासाठी काही नियम सांगण्यात आले आहेत. गणपती, हनुमानजीला आणि देवीला नेहमी तीन प्रदक्षिणा घालाव्यात. राम, कृष्ण आणि विष्णूच्या कुठल्याही अवतार असलेल्या देवाला चार प्रदक्षिणा घालाव्यात. शिवाय प्रदक्षिणा घालताना मधेच कधीही थांबू नयेत. जिथू प्रदक्षिणा सुरु केली तिथेच ती पूर्ण करावी. प्रदक्षिणा मारताना कोणाशी बोलू नयेत. तर प्रदक्षिणेदरम्यान पाय कोणालाही लागू नये याची काळजी घ्यावी. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)