Lucky zodiac signs mahashivratri 2023 : उद्या महाशिवरात्री आहे. ज्योतिषांच्या मते, महाशिवरात्रीच्या (Mahashivratri 2023) आधी काही ग्रहांचे गोचर खूप शुभ संकेत देत आहे. अशा परिस्थितीत काही राशींच्या लोकांना चांगले दिवस येणार आहेत. भगवान शिवशंभोचे भक्त वर्षभर शिवरात्रीची प्रतीक्षा करतात. 18 फेब्रुवारी रोजी शिवरात्रीचा उत्सव होणार आहे. यावेळी महाशिवरात्रीला एक विलक्षण योगायोग घडत आहे. ( Mahashivratri News)
भगवान भोलेनाथ म्हणजेच शिवशंभू यांच्याशी संबंधित या उत्सवापूर्वी दोन मोठ्या ग्रहांचे गोरच झाले आहे. याआधी म्हणजे 13 फेब्रुवारीला, देवतांचा राजा, सूर्याने कुंभ राशीत प्रवेश केला, त्यानंतर 15 फेब्रुवारीला शुक्र देव मीन राशीत दाखल झाला आहे. अशा परिस्थितीत महाशिवरात्रीपूर्वी या दोन प्रमुख ग्रहांचे राशी गोचर अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. महाशिवरात्रीपूर्वी ग्रहांचे गोचर या पाच राशींसाठी चांगले दिवस येण्याचे संकेत देत असल्याचे ज्योतिषी सांगत आहेत.
मिथुन : महाशिवरात्रीपासून सर्व मिथुन राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. शुभ परिणाम मिळतील. आर्थिक आघाडीवर लाभ होईल. नोकरीत प्रगती होईल. ऑफिसमध्ये कामाचे कौतुक होईल. दुसरीकडे, धैर्य आणि शौर्य वाढल्याने सन्मान वाढेल. नातेसंबंधांबद्दल बोलायचे तर वैवाहिक जीवन देखील आनंदी असेल. त्यामुळे शिवशंभूच्या कृपेने मिथुन राशीच्या लोकांसाठी काळ चांगला असणार आहे.
सिंह : महारात्रीच्या सणात सिंह ही दुसरी भाग्यवान रास आहे. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांसाठी नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. तुमच्या सर्व योजना यशस्वी होतील. दुसरीकडे, जे लोक त्यांच्या नोकरीमध्ये कोणत्याही कारणामुळे त्रासले होते, त्यांना चांगली बातमी मिळणार आहे. 31 मार्चपूर्वी तुम्हाला उत्कृष्ट मूल्यांकन मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच नवीन आर्थिक वर्षात तुमची बढती आणि वाढ होण्याची शक्यता आहे.
कन्या : या महाशिवरात्रीला सर्व 12 राशीच्या लोकांवर त्यांच्या शुभ कर्मानुसार शिवशंभूचा आशीर्वाद मिळू शकतो. असे असले तरी तुमच्या कुंडलीनुसार जर तुम्ही कन्या राशीचे असाल तर येणारा महाशिवरात्रीचा सण तुमच्यासाठीही शुभ मानला जातो. नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित लाभ होतील. धनवृद्धीसोबतच रोख आणि पैशांच्या व्यवहारातही लाभ होईल. तुम्ही कोणत्याही मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठीही वेळ अनुकूल असेल. या कालावधीत केलेली गुंतवणूक दीर्घकालीन लाभ देईल. वैवाहिक जीवनातही आनंद असेल.
धनु : महाशिवरात्रीपासून धनु राशीच्या लोकांचे चांगले दिवसही सुरु होतील. योग्यवेळी योग्य निर्णय घेतल्यास तुमच्यावरही पैशांचा वर्षाव होऊ शकतो. म्हणजेच पैशाच्या व्यवहारासाठी काळ अनुकूल राहील. कर्जात अडकलेले पैसेही मिळू शकतात. गुंतवणुकीसाठीही वेळ उत्तम आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढताना दिसतील. समाजात मान-सन्मान मिळेल आणि वाढेलही.
कुंभ : महाशिवरात्रीचा सण कुंभ राशीच्या लोकांचे भाग्य उजळवणारा ठरु शकतो. महाशिवरात्रीपासून तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. कुंभ राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. पैशांची बचत होईल. खर्चावर नियंत्रण वाढेल. तुम्हाला चांगल्या नोकरीच्या ऑफर देखील मिळू शकतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)