August 2022: आठवड्यानंतर मंगळ मेष राशीतून वृषभ राशीत करणार प्रवेश, या राशींना मिळणार दिलासा

सध्या मेष राशीत दीड वर्षांसाठी राहु विराजमान आहे. त्यात मंगळ ग्रहाने मेष राशीत प्रवेश केल्याने अंगारक योग तयार झाला आहे.

Updated: Aug 2, 2022, 03:09 PM IST
August 2022: आठवड्यानंतर मंगळ मेष राशीतून वृषभ राशीत करणार प्रवेश, या राशींना मिळणार दिलासा title=

Mangal Grah Gochar August 2022: ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला ग्रहांचं सेनापती संबोधलं जातं. मंगळ ग्रहाचं एका राशीतून दुसऱ्या राशीत भ्रमण सर्व राशींवर परिणाम करते. काही राशींना शुभ, तर काही राशींना अशुभ फळ मिळतात. सध्या मेष राशीत दीड वर्षांसाठी राहु विराजमान आहे. त्यात मंगळ ग्रहाने मेष राशीत प्रवेश केल्याने अंगारक योग तयार झाला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या योग तयार झाल्यास अप्रिय घटना घडतात. मेष राशीत हा योग 10 ऑगस्टपर्यंत असणार आहे. 10 ऑगस्टला रात्री 9 वाजून 32 मिनिटांनी मंगळ ग्रह वृषभ राशीत प्रवेश करेल. ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळ ग्रह चांगल्या स्थितीत असतो, असे लोक साहसी आणि निर्भय असतात. त्यामुळे मंगळ ग्रहाचा काही राशींवर सकारात्मक प्रभाव जाणवेल. 

वृषभ: 10 ऑगस्टला मंगळ ग्रह या राशीत प्रवेश करणार आहे. अशा परिस्थितीत या राशींसाठी हे संक्रमण खूप फायदेशीर ठरणार आहे. नोकरीसोबतच त्यांना व्यवसायातही प्रगती होणार आहे. या दरम्यान रखडलेली कामे पूर्ण होतील. कोर्टात सुरू असलेल्या वादातून तुमची सुटका होईल. शत्रूंवर विजय मिळवण्यात यशस्वी व्हाल.  

कर्क: या राशीच्या लोकांसाठीही हे संक्रमण शुभ राहील. या दरम्यान नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना फायदा होईल. सरकारी कामात यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांचं कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. तसेच पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. पैशाची चणचण आणि कर्जापासून तुमची सुटका होईल.

सिंह: या राशीच्या लोकांसाठी हा काळ फलदायी असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.

धनु: या राशीच्या लोकांना हे गोचर फलदायी ठरेल. या दरम्यान प्रत्येक कामात यश मिळेल. मेहनत आणि वेळेचं योग्य नियोजन केल्यास इच्छित फळ मिळेल. या काळात केलेली गुंतवणूक आगामी काळात आर्थिक यश देईल.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)