Mangal Gochar Mars Transit 2023 : मंगळ हा मेष राशीचा स्वामी आहे. मंगळ ग्रहांचा सेनापती 13 मार्च रोजी राशी बदलणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, ज्यावेळी एखादा ग्रह गोचर होतो. त्यावेळी तो सर्व राशींच्या लोकांवर जीवनावर त्याचा शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो असतो. अशावेळी मिथुन राशीतील मंगळाचे गोचर काही लोकांसाठी खूप शुभ आणि फलदायी असणार आहे. या काळात कोणत्या राशींना विशेष लाभ होणार आहे, ते जाणून घ्या.
ज्योतिषशास्त्रानुसार, ज्यावेळी एखादा ग्रह गोचर होतो. त्यावेळी त्याचा शुभ आणि अशुभ प्रभाव हा काही राशींच्या लोकांच्या जीवनावर पडतो. मंगळ हा धैर्य आणि शौर्याचा कारक मानला जातो. मंगळ ग्रहांचा सेनापती 13 मार्च रोजी राशी बदलणार आहे. मंगळ वृषभ सोडून मिथुन राशीत प्रवेश करेल. मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. दुसरीकडे, मकर राशीमध्ये उच्च चिन्ह आहे आणि कर्क राशीमध्ये निम्न चिन्ह आहे. अशा स्थितीत मिथुन राशीतील मंगळाचे गोचर हे काही लोकांसाठी खूप शुभ आणि फलदायी असणार आहे.
मेष
ग्रह बदल हा काही संकेत देत असतो. ग्रह गोचर मंगळाच्या तिसऱ्या घरात होणार आहे. मंगळ देखील या घराचा कारक मानला जातो. त्याचवेळी, मंगळ देखील मेष राशीचा स्वामी आहे. अशा स्थितीत मेष राशीच्या लोकांसाठी या घरात मंगळाचा प्रवेश खूप शुभ मानला जाईल. या काळात कोणतेही जोखमीचे काम सुरु करता येईल आणि त्यात फायदा होईल. नोकरीच्या ठिकाणी यशाची शिडी चढेल. सहलीला जाण्याचा बेत आखाल. दुसरीकडे, जर तुम्ही प्रवासाच्या व्यवसायाशी संबंधित असाल तर चांगला फायदा होऊ शकतो.
मिथुन
या राशीत मंगळाचे गोचर होत असल्याने याचा लाभ मिळणार आहे. व्यवसायात फायदा होईल आणि आर्थिक संकटातून सुटका मिळेल. या काळात तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा, ते तुमच्यासाठी चांगले असेल. पत्नीशी प्रेमाणे वागा. काही ठिकाणी नेतृत्व करण्याची जबाबदारी मिळू शकते. या काळात आरोग्य चांगले राहील आणि तुम्ही अनेक तास सतत काम करू शकाल.
धनु
येणारा पुढील काळ तुमच्यासाठी चांगला आहे. जर तुम्ही नवीन कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यातही यश मिळेल. कोर्ट-कचेरी किंवा जमीन-मालमत्तेच्या प्रकरणांतून तुमची सुटका होईल आणि तुम्ही यश मिळवू शकाल. तुमचे आरोग्यही छान राहिल. ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ तुमच्या 6 व्या घरात प्रवेश करणार आहे. या दरम्यान शत्रूंचा प्रभाव कमी होईल. जर तुम्ही कर्ज वगैरे घेतले असेल तर तेही संपुष्टात येऊ शकते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)