Mangal Gochar : 16 ऑक्टोबरला होतंय मंगळ गोचर; 'या' 4 राशींचं नशीब फळफळणार!

मंगळ गोचरमुळे या दिवाळीत 4 राशींचं भाग्य उजळणार आहे. 

Updated: Oct 14, 2022, 11:56 AM IST
Mangal Gochar : 16 ऑक्टोबरला होतंय मंगळ गोचर; 'या' 4 राशींचं नशीब फळफळणार! title=

मुंबई : मंगळ ग्रह सर्वांना लाभदायक ठरतो असं मानलं जातं. जेव्हा तो राशी बदलतो तेव्हा ते अनेक राशींच्या आयुष्यात आनंद निर्माण होतो. यंदाच्या वेळी दिवाळीपूर्वी मंगळाचं भ्रमण होणार आग. 16 ऑक्टोबरला तो मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ गोचरमुळे या दिवाळीत 4 राशींचं भाग्य उजळणार आहे. 

यामुळे 5 राशींना अचानक कुठूनतरी पैसे मिळण्याची शक्यता आहे. तसंच काही मुली नवीन मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 4 राशी कोणत्या आहेत. 

कुटुंबात राहील सुख-शांती 

वृषभ

मंगळाच्या गोचरमुळे या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. यावेळी या राशीच्या व्यक्तींच्या कुटुंबामध्ये सुख-शांती नांदणार आहे. व्यवसायात कुटुंबीयांचं सहकार्य लाभेल. घराची आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.

सिंह

या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढणार आहे. यावेळी तुम्ही नोकरीही बदलू शकता. तसंच तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे. भाऊ-बहिणीच्या सहकार्याने व्यवसायाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. पालकांचं सहकार्य मिळणार आहे. 

नवीन गोष्टी घरी येतील

तूळ

तुमच्या खासगी आयुष्यात सुख येणार आगे. घरात अनेक नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू येऊ शकतील. या काळात तुमच्या मनाला शांती लाभणार आहे. अभ्यासाशी संबंधित कामात यश मिळेल. तुम्ही स्वतःच्या घराची खरेदी करू शकता. 

धनु

मंगळाच्या गोचरामुळे तुम्हाला नोकरीत अतिरिक्त जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढू शकते. कुटुंबात मंगल कार्य होणार आहे. जुना मित्र किंवा नातेवाईक घरी येतील.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची खातरजमा करत नाही.)