Margashirsh Mahalakshmi Guruwar Vrat 2022: कार्तिक मास संपण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला आहे. 23 नोव्हेंबर कार्तिकी अमावास्या असून 24 नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु होणार आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार, श्रावण महिन्यानंतर मार्गशीर्ष हा सर्वात पवित्र महिना आहे. यंदा मार्गशीर्ष महिन्यात 5 गुरुवार येत आहेत. गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं. तसेच घट मांडणी करून व्रतकथा वाचली जाते. कुमारिका आणि सुहासिनी महिला मोठ्या भक्तिभावाने देवीची पूजा करतात. विशेष म्हणजे एका गुरूवारी दत्त जयंतीचा योग जुळून आला आहे. गुरुवारी महालक्ष्मीची घट मांडणी, पूजा कशी कारावी याबाबत जाणून घ्या...
घरातील फ्लोअर गोमुत्र शिंपडल्यानंतर स्वच्छ पाण्याने पुसून घ्या. त्यानंतर घट मांडण्याच्या ठिकाणी रांगोळी काढावी. त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा. त्यावर लाल कपडा व्यवस्थितरित्या घालावा. त्यावर तांदूळ ठेवून बरोबर मध्यभागी कळश ठेवावा. कळशात दूर्वा, पैसा आणि सुपारी घालावी. अंब्याची पाच पान ठेवून त्यावर नारळ ठेवावा. कळशाला चारही बाजून हळद-कुंकू लावावं. चौरंगावर देवी लक्ष्मीचा फोटो आणि श्रीयंत्र ठेवा. देवीपुढे पाच फळं, लक्ष्मी कवडी यांची मांडणी करावी. तसेच देवीपुढे पाच पानांचा विडा ठेवावा. नैवेद्य म्हणून लाह्या, गुळ, बाताशे ठेवावे.
Shani Gochar: 30 वर्षानंतर कुंभ राशीत येणार शनिदेव, या तीन राशींना मिळणार दिलासा
देवी लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावावा. तसेच कमळाचे फूल अर्पण करावे. श्री महालक्ष्मी व्रत कथा वाचावी. त्यानंतर लक्ष्मी अष्टकम, कनकधारा स्तोत्र, श्रीसुक्त याचं पठण करावं. त्यानंतर महालक्ष्मीची मनोभावे आरती करावी. त्यानंतर मनातील इच्छा प्रकट करून देवीला नमस्कार करावा. देवीसाठी नैवेद्य दाखवावा, तसेच गायीसाठी एक वेगळं पान काढावं. त्यानंतर कुटुंबासोबत आनंदाने भोजन करावं. दुसऱ्या दिवशी कळशातील पाणी घरात शिंपडावं किंवा तुळशी वृंदावनात टाकावं. तसेच निर्माल्याचं विसर्जन करावं. शेवटच्या गुरुवारी पाच कुमारिका आणि पाच सवाष्णींना बोलवून हळदी कुंकू करावं. दक्षिणा आणि महालक्ष्मी व्रतकथा पुस्तक द्यावं.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)