Budh Gochar 2023 : बुध गोचरमुळे 'या' राशींवर संकटाचे ढग, 'हे' उपाय ठरू शकतील फायदेशीर

Mercury Transit In Taurus : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांचं उदय आणि ग्रह अस्त अतिशय महत्त्वाचं आहे. ग्रहांचा स्थितीचा मानवी जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसून येतो. बुध गोचरमुळे काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात संकट येणार आहेत.   

नेहा चौधरी | Updated: May 12, 2023, 07:25 AM IST
Budh Gochar 2023 : बुध गोचरमुळे 'या' राशींवर संकटाचे ढग, 'हे' उपाय ठरू शकतील फायदेशीर title=
mercury transit 2023 Budh Gochar Budh Rashi Parivartan june these zodiac signs bad effects and upay in marathi

Budh Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध हा ग्रहांचा राजकुमार मानला जातो. बुध ग्रह हा तर्क आणि बुद्धीचा कारक आहे. प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळेनंतर आपली जागा बदलतो. कुंडलीतील ग्रहांची स्थिती हे आपलं आयुष्याची रेषरुपा ठरवतं. ग्रहांचं अस्त आणि उदय 12 ही राशींवर अशुभ किंवा शुभ ठरतात. लवकरच बुध ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. त्यामुळे 5 राशींवर संकटाचे ढग घोंघावत आहे. 

कधी आहे बुध गोचर? (mercury transit 2023)

बुध गोचर वृषभ राशीत 7 जूनला प्रवेश करणार आहे. त्यामुळे बुध गोचरचा नोकरी आणि व्यवसायवर परिणाम होणार आहे. तो काही राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे तर काही राशींसाठी तो नकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. बुधाचे संक्रमण 5 राशींसाठी अशुभ परिणाम दिसणार आहे, बघूयात त्या कुठल्या राशी आहेत आणि काय उपाय करावेत ते पाहूयात (mercury transit 2023 Budh Gochar Budh Rashi Parivartan june these zodiac signs bad effects and upay in marathi)

मेष (Aries)

या राशीसाठी बुध गोचर अतिशय अशुभ ठरणार आहे. कुंटुंबात कहर निर्माण होईल. जोडीदारासोबत वादविवाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती खराब होईल. मनात कायम असुक्षिततेची भावना घर करुन राहिल. कामाच्या ठिकाणी अपयशाचा सामना करावा लागू शकतो. या काळात तुमची मानसिक स्थिती चांगली नसणार आहे. 

उपाय - “ॐ नरसिंहाय नम:” या मंत्राचा 41 वेळा दररोज जर करा. 

मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांना बुध गोचरमुळे आरोग्याची समस्या त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडणार आहे. या काळात जास्त जास्त खर्च होणार आहे. मेहनत करुनही होणारी कामं बिघडणार आहेत. आर्थिक स्थिती चांगलीच डबघाईला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. 

उपाय - “ॐ नमः शिवाय” या मंत्राचा दररोज 21 वेळा जप करा. 

सिंह (Leo)

या राशीच्या लोकांसाठी बुध गोचर अनेक संकट घेऊन येणार आहे. आरोग्याची समस्या जास्त प्रमाणात त्रास देणार आहे. त्वचेची ऍलर्जी आणि घशाशी संबंधित आजार तुम्हाला होण्याची शक्यता आहे. उद्योग आणि नोकरीच्या ठिकाणी प्रगती मंदावरणार आहे. त्यामुळे सतत तुम्हाला ताण जाणवणार आहे. 

उपाय - दररोज विष्णु सहस्रनामाचे पठण करा. 

वृश्चिक (Scorpio)

या राशीच्या लोकांनाही बुध गोचरमुळे खूप त्रास होणार आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि सहकाऱ्यांशी संबंधात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यवसायिकांनाही कठीम स्पर्धेचा सामना करावा लागणार आहे. या काळ तुमच्यासाठी ताण आणि मानसिक स्थिती खराब करणारा ठरणार आहे. गुंतवणुकीतून आर्थिक स्थिती बिघडणार आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. 

उपाय - “ॐ भौमाय नम:” या मंत्राचा दररोज 27 वेळा जप करा.

मीन (Pisces)

बुध गोचर हा मीन राशीच्या लोकांसाठी आर्थिक संकट घेऊन येणार आहे. या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. प्रवासातून आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. घशा आणि त्वचेशी संबंधित त्रास होऊ शकतो. आरोग्याकडे लक्ष द्या. प्रेम संबंधात मतभेद होऊन दुरावा येण्याची शक्यता आहे. 

उपाय - दर गुरुवारी ज्येष्ठांना दान करा. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)