Mohini Ekadashi 2023 in marathi : वैशाख महिन्यातील एकादशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. यादिवशी दोन दुर्मिळ योगायोग घडून आले आहेत. वैशाख शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोहिनी एकादशी असं संबोधलं जातं. मोहिनी एकादशी ही 30 एप्रिल 08.28 मिनिटांपासून 1 मे 2023 ला 10.09 पर्यंत असणार आहे. हिंदू धर्मात उदय तिथीनुसार उत्सव साजरे केले जातात. त्यामुळे मोहिनी एकादशी ही 1 मे 2023 ला म्हणजे सोमवारी साजरी केली जाणार आहे.
मोहिनी एकादशी ही विशेष आणि शुभ मानली जाते. पण यंदा ती अतिशय खास आहे कारण, यावेळी दोन दुर्मिळ शुभ योग जुळून आले आहेत. रवि आणि ध्रुव योग या दिवशी आहे. त्यामुळे या दिवशीच्या पूजेतून भक्तांना दुप्पट फळं मिळणार असं ज्योतिषशास्त्र तज्ञ म्हणतात.
रवि योग - सकाळी 05:41 - संध्याकाळी 05:51 (1 मे 2023)
ध्रुव योग - 30 एप्रिल 2023 सकाळी 11.17 वाजता - 1 मे 2023 सकाळी 11.45 वाजता
उपवासाची वेळ - 2 मे, सकाळी 05.40 ते 08.19 पर्यंत
या दिवशी पशु पक्ष्यांना अन्न - पाणी नक्की द्या. पुण्य प्राप्त होतं.
या दिवशी गरिबांना अन्नदान नक्की करा.
भगवान विष्णूंना तुळशी प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी घरात तुळशीचं रोप नक्की लावा.
या दिवशी अन्नदानासोबतच शूज आणि चप्पल दान करा.
या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठा आणि स्नान करा.
त्यानंतर पिवळे वस्त्र घालून भगवान विष्णूची पूजा करा.
भगवान विष्णूला पिवळी फुलं अर्पण करा.
उदबत्ती, दिवा लावून आरती करा.
नैवेद्य दाखवा.
या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला गाईच्या दुधापासून बनवलेली खीर अर्पण करा.
या दिवशी लक्ष्मी मातेला लाल वस्त्र आणि भगवान विष्णूला पिवळे वस्त्र अर्पण करा.
संध्याकाळी तुळशीसमोर शुद्ध देशी तुपाचा दिवा लावा.
ॐ श्री तुलस्यै विद्महे। विष्णु प्रियायै धीमहि। तन्नो वृन्दा प्रचोदयात्। मंत्राचा 11 जप करा.