Navratri 2022: अष्टमी, नवमीच्या शुभ मुहूर्तावर करा अशी पूजा, मिळेल देवीचा आशीर्वाद

शारदीय नवरात्रीच्या 9 दिवसांपैकी अष्टमी आणि नवमी या दिवसांचं खास महत्त्व आहे. देवी दुर्गेला कृपा अशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी देवीची विशेष पूजा केली जाते. 

Updated: Sep 29, 2022, 12:57 PM IST
Navratri 2022: अष्टमी, नवमीच्या शुभ मुहूर्तावर करा अशी पूजा, मिळेल देवीचा आशीर्वाद  title=

Navratri 2022 Kanya Pujan Significance: शारदीय नवरात्रीच्या 9 दिवसांपैकी अष्टमी आणि नवमी या दिवसांचं खास महत्त्व आहे. देवी दुर्गेला कृपा अशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी देवीची विशेष पूजा केली जाते. त्यामुळे या दोन दिवसांना महाअष्टमी आणि महानवमी असं संबोधलं जातं. या दिवसात केलेली पूजा आणि उपाय फळतात, असं हिंदू धर्मशास्त्रात सांगितलं आहे. दोन दिवस दुर्गादेवीची पूर्ण भक्तिभावाने पूजा केल्यास ९ दिवसांच्या उपासनेइतके फळ मिळते. यामुळे सर्व दुःख, वेदना आणि भीती दूर होते. यासोबतच जीवनात सुख-समृद्धी येते. या वर्षी अष्टमी आणि नवमी केव्हा साजरी केली जाईल आणि या काळात कोणती कामे खूप फलदायी आहेत हे जाणून घेऊया.

हिंदू पंचांगानुसार, या वर्षी शारदीय नवरात्रीची अष्टमी तिथी 3 ऑक्टोबरला आणि नवमी तिथी 4 ऑक्टोबर 2022 रोजी साजरी केली जाईल. नवमी तिथी 3 ऑक्टोबरच्या संध्याकाळी 4:37 पासून सुरू होईल आणि 4 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 2:20 पर्यंत चालेल. उदयतिथीनुसार  महानवमी 4 ऑक्टोबर 2022 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी सकाळी 06.21 ते दुपारी 02:20 पर्यंत सुमारे 8 तास हवन-पूजेचा शुभ मुहूर्त असेल. त्याच वेळी, नवरात्री व्रताच्या पारणाची वेळ 4 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 02:20 नंतर असेल. 

अश्विन कृष्ण पक्ष नवमीला अशी पूजा करा

- या दिवशी पूर्ण विधीपूर्वक हवन केल्यास नवरात्रीच्या पूजेचे पूर्ण फळ मिळते. नवमीला हवनात देवीच्या सहस्रनामांचा जप करताना आहुती द्यावी. असे केल्याने 9 दिवसांची उपासना आणि तपस्याचे फळ अनेक पटीने मिळते.

-कन्या पूजन झाल्याशिवाय नवरात्रीची पूजा पूर्ण होत नाही. म्हणून महानवमीच्या दिवशी 9 मुलींना आदरपूर्वक भोजन द्या. त्यांची पूजा करून आशीर्वाद घ्या आणि काही भेटवस्तू द्या. मुली देवी दुर्गेचे रूप आहेत.