Numerology Holi 2024 Tips in Marathi : होळीचा उत्साह हा वाईटावर चांगल्याचा विजय मानला जातो. हिंदू पंचांगानुसार हिंदू कॅलेंडरनुसार होळीचा सण हा शेवटचा मानला जातो. होळी म्हणजे नवीन आयुष्याची रंगीत सुरुवात असते. अंकशास्त्रानुसार होळीच्या दिवशी कुठल्या मूलांकाने काय करावं हे एस्ट्रो आणि अंकशास्त्र तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलं आहे. होळी हा रंगांचा सण, आयुष्यातही सुख, समृद्धी आणि प्रगतीसाठी काही अकंशास्त्राचे नियम पाळल्यास तुम्हाला फायदा होईल असं कविता ओझा यांनी सांगितलंय.
अंकशास्त्रानुसार 5, 14, 23 या तारखेला ज्यांचा वाढदिवस आहे, त्या लोकांनाचा मूलांक हा 5 असतो. मग होळीच्या दिवशी या मूलांक असलेल्या लोकांनी काय करावं याबद्दल सांगितलं आहे. त्यांनी सांगितलेल्या नियमाचं पालन केल्यास तुम्हाला फायदा होईल असं कविता म्हणतात. (numerology prediction do these upay on holi with people born on date 5 14 23 ank shashtra)
अंकशास्त्रानुसार 5 हा क्रमांक बुध ग्रहाशी जुळला गेला आहे. या मूलांकाच वैशिष्ट्य म्हणजे यांची सर्वांसोबत मैत्री होते. जर कोणाची गोष्ट तुम्हाला खट्टकली असेल किंवा कोणामुळे तुम्ही दु:खी झाले असाल. अशा लोकांशी तुम्ही या होळीला सगळे मतभेद मिटवून टाका. तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात करा आणि होळीचा उत्साह साजरा करा. या मूलांकाचा हिरवा हा भाग्यशाली रंग असतो. हिरव्या रंगाची खासियत आहे की, तो कुठल्याही जगाला ताजेतवाने करतो.
त्यामुळे तुमच्या आयुष्यातील सकारात्मक ऊर्जा सगळ्यांमध्ये वाटप करा. लोकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करा. या होळीच्या दिवशी तुम्ही परिधान करा हिरवा किंवा पांढरा रंग. तसंच हिरवा, पांढरा, फिकट पिवळा, एक्वा ब्लू या रंगांनी होळी खेळा.
तुम्हाला माहिती की, रोप घरात गुड लक आणतात. त्यामुळे होळीच्या मुहूर्तावर तुम्हालाही घरात मनीप्लंट आणायचा. एवढंच नाही तर त्यांची काळजी घ्यायची आणि त्यांच्यासोबत वेळ घायवायचा आहे. जसं जसं ते रोप वाढणार आहे, तसं तसं तुमच्या आयुष्यात समृद्धी आणि प्रगती होणार.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)