Panchak February 2023 : सोमवार 20 फेब्रुवारीपासून पंचक! पुढील 5 दिवस 'या' 4 गोष्टी करू नका, अन्यथा...

Inauspicious time in February :  सोमवारपासून या महिन्याची पंचक वेळ सुरू होत आहे. यादरम्यान पुढील 5 दिवस अशुभ मुहूर्त असणार आहे, ज्यामध्ये 4 गोष्टी चुकूनही करू नयेत, अन्यथा कुटुंबावर मोठं संकट कोसळण्याची भीती आहे.   

Updated: Feb 19, 2023, 09:16 AM IST
 Panchak February 2023 : सोमवार 20 फेब्रुवारीपासून पंचक! पुढील 5 दिवस 'या' 4 गोष्टी करू नका, अन्यथा... title=
panchak february 2023 date start and end time dont do these work during raj panchak next 5 days 20 february to 24 february in marathi

Panchak February 2023 Dates in marathi : हिंदू आणि सनातन धर्मात शुभ कार्य सुरु करण्यापूर्वी गणरायची पूजा केली जाते. याशिवाय कुठलही शुभ काम असो वेळ पाहिल्याशिवाय आपण करत नाहीत. त्यामुळे पुढील पाच दिवस खूप महत्त्वाचे आहेत. कारण तुम्ही शुभ कार्य करण्याचा विचार करत असाल तर आताच थांबा. हिंदू पंचांगनुसार महिन्यातील 5 दिवस हे अशुभ असतात. या काळात कुठलेही शुभ कार्य करायचे नसतात. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातील अशुभ काळ सोमवारी 20 फेब्रुवारीपासून सुरु होते आहे. या 5 दिवसाला पंचक असं म्हटलं जातं. या पंचकमध्ये चुकूनही काही कामं करायची नसतात. अन्यथा कुटुंबावर मोठं संकट कोसळतं. (panchak february 2023 date start and end time dont do these work during raj panchak next 5 days 20 february to 24 february in marathi)

पंचक किती दिवस चालणार? (2023 Panchak Dates with Start and End Timings)

हिंदू पंचागानुसार, या महिन्याचे पंचक (Panchak February 2023) 20 फेब्रुवारी रोजी पहाटे 1.14 वाजता सुरू होईल आणि 24 फेब्रुवारी शुक्रवारी पहाटे 3.44 वाजता समाप्त होईल. सोमवारपासून सुरू होत असल्याने याला राज पंचक असं म्हटलं जातं. या काळात नवीन कामं सुरू करणे टाळावं लागेल. मात्र आधीच चालू असलेली कामं करण्यात कोणताही अडथळा येणार नाही आणि तुम्ही ती आरामात करू शकता. 

राज पंचकात काय करु नये?

  1. पंचकात (Panchak February 2023) लाकडाशी संबंधित अनेक कामं करु नये.  लाकूड जाळणे, कोरडे गवत गोळा करणे किंवा जाळणे टाळावे. लाकडा संबंधित कुठलंही कार्य केल्यास घरात संकट येते. 
  2. पंचक काळात खाट बांधणे शास्त्राच्या विरुद्ध मानलं जातं. असे म्हणतात की या अशुभ काळात खाट बांधणे भविष्यात व्यक्तीला अडचणीत आणू शकतं. त्याला काही गंभीर आजार होऊ शकतात, ज्यामुळे तो खाटेवर पडून राहू शकतो.
  3. पंचक (Panchak February 2023) काळात दक्षिण दिशेला प्रवास करणे अशुभ मानलं जातं. दक्षिण दिशा ही मृत्यूची देवता यमाची दिशा म्हणून ओळखली जाते. त्यामुळे पंचक काळात या दिशेने जाणे टाळावे. अतिशय महत्त्वाचे काम असल्यास ही खाऊनच घराबाहेर जावे. 
  4. पंचक काळात (Panchak February 2023) घराचे नवीन छत बनवू नये. असं म्हटलं जातं की असं केल्याने घरातील लोकांमध्ये वाद वाढतात, त्यामुळे धनहानी होते आणि कुटुंबात भांडणे वाढतात. त्यामुळे ही अशुभ वेळ संपल्यानंतरच हे काम सुरू करण्याचा प्रयत्न करा. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)