Panchang Today : पाहा काय सांगतं पंचांग, कोणती वेळ आहे आज शुभ?

राहुकाल, दिशाशूल, भद्रा, पंचक, प्रमुख सण इत्यादींबद्दल महत्त्वाची माहिती आज आपण घेऊया.

Updated: Aug 18, 2022, 09:15 AM IST
Panchang Today : पाहा काय सांगतं पंचांग, कोणती वेळ आहे आज शुभ? title=

मुंबई : हिंदू धर्मात कोणतंही काम शुभ दिवस, शुभ तिथी, शुभ मुहूर्त या गोष्टी पाहून केलं जात. या सर्व गोष्टींचा शोध घेण्यासाठी पंचांग आवश्यक आहे. ज्याद्वारे तुम्हाला सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त, ग्रह, नक्षत्र इत्यादींसोबतच येणाऱ्या दिवसांच्या शुभ-अशुभ काळाची सविस्तर माहिती मिळू शकते. 

पंचांगाचं पाच भाग - तिथी, नक्षत्र, वार, योग आणि करण तसंच राहुकाल, दिशाशूल, भद्रा, पंचक, प्रमुख सण इत्यादींबद्दल महत्त्वाची माहिती आज आपण घेऊया.

भद्रा आणि राहुकाल 

हिंदू धर्मात कोणतंही शुभ कार्य करताना भद्रा किंवा राहुकाल असणं शुभ मानलं जात नाही. असं मानतात की, या दोघांच्या काळात मनुष्याच्या कामात सर्व प्रकारचे अडथळे येतात. 

पंचांगानुसार, 18 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 08:24 पासून सुरू झालेली भद्रा 18 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 08:46 पर्यंत राहील, तर आज राहुकाल दुपारी 02:03 ते 03:41 या दरम्यान राहील. अशा परिस्थितीत या काळात कोणतंही शुभ कार्य करणं टाळावं.

हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करताना तिथी, शुभ काळ इत्यादींसोबत शुभ दिशेकडेही विशेष लक्ष दिलं जातं. पंचांग नुसार, गुरुवारच्या दिवशी व्यक्तीने कोणतंही विशेष काम करण्यासाठी दक्षिण दिशेकडे जाणं टाळावं. कारण या दिवशी या दिशेला एक दिशा असते, जी कोणत्याही व्यक्तीच्या कार्याच्या यशात अडथळा बनते. 

पंचांगानुसार जर गुरुवारी दक्षिण दिशेला जाणं खूप महत्वाचे असेल तर त्यावर उपाय म्हणून घरातून बाहेर पडताना दही अवश्य खावं. असं केल्याने दिशा दोष होत नाहीत असं मानलं जातं.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे  ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)