Pradosh Vrat 2024 : प्रदोष व्रताला चंद्र मंगळ युतीतून धन योग! 5 राशींच्या लोकांना पैसाच पैसा

Pradosh Vrat 2024 : प्रदोष व्रताला वृद्धी योग, ध्रुव योगासह अनेक फायदेशीर योग निर्माण झाले आहेत. ज्यामुळे मंगळवारचा दिवस पाच राशींसाठी फायदेशीर सिद्ध होणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jan 9, 2024, 12:20 AM IST
Pradosh Vrat 2024 : प्रदोष व्रताला चंद्र मंगळ युतीतून धन योग! 5 राशींच्या लोकांना पैसाच पैसा title=
Pradosh Vrat 2024 Dhan Yoga for Pradosh Vrat from Moon Mars Alliance Money for people of 5 zodiac signs

Pradosh Vrat 2024 : या वर्षातील पहिलं प्रदोष व्रत पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. ही तिथी मंगळवारी आल्यामुळे याला भौम प्रदोष व्रत असं म्हटलं जातं. . भौम प्रदोष व्रताच्या दिवशी वृद्धी योग, ध्रुव योग आणि ज्येष्ठ नक्षत्र यांचा शुभ संयोग निर्माण होतो आहे. त्याशिवाय वृश्चिक राशीनंतर चंद्र धनु राशीत असणार आहे. धनु राशीमध्ये मंगळ आधीपासूनच आहे, त्यामुळे धनु राशीमध्ये चंद्र आणि मंगळाच्या संयोगामुळे धन योग निर्माण होतो आहे. (Pradosh Vrat 2024 Dhan Yoga for Pradosh Vrat from Moon Mars Alliance Money for people of 5 zodiac signs)

मेष रास (Aries Zodiac) 

तुम्हाला शत्रूंपासून मुक्ती मिळणार आहे. जर तुम्ही प्रॉपर्टी डील करण्याचा निर्णय घेतला असाल तर प्रदोष व्रताचा दिवस उत्तम आहे. तुमच्या जोडीदारासोबतचा विश्वास मजबूत होणार आहे. तुम्हाला एकमेकांची साथ मिळणार आहे. कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या लग्नाची चर्चा घरात आनंदाच वातावरण असणार आहे. एखादी महागडी वस्तू खरेदी करणार आहात. व्यापारी आणि व्यावसायिकांची नफा मिळविण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभावही वाढणार आहे. 

कर्क रास (Cancer Zodiac)   

या राशीच्या लोकांना प्रदोष व्रत शुभ ठरणार आहे. कर्क राशीच्या लोकांना सर्व प्रकारचे सुख मिळणार आहे. त्यांची वाहन किंवा घर खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. उद्या तुम्ही तुमच्या व्यावसायिक जीवनात सकारात्मक बदल पाहिला मिळणार आहे. चांगल्या नोकरीची ऑफर मिळणार आहे. प्रेमाच्या बाबतीत तुमचा उत्साह शिगेला असणार आहे. तुम्ही तुमच्या लव्ह पार्टनरसोबत एखाद्या छान ठिकाणी डिनरला जाणार आहात. जर तुम्ही शेअर्स किंवा सट्टा बाजारात पैसे गुंतवले असतील तर तुम्हाला चांगला नफा मिळणार आहे. 

कन्या रास (Virgo Zodiac)   

या राशीच्या लोकांना प्रदोष व्रत लाभदायक असणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. तुम्हाला प्रत्येक कामात उत्तुंग यश मिळणार आहे. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांसोबत अविस्मरणीय वेळ घालवण्याची संधी मिळणार आहे. ज्यामुळे मानसिक शांती आणि आनंद तुम्हाला लाभणार आहे. तुमच्यापैकी काहीजण नवीन नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना नोकरीची ऑफर येणार आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही चांगली बातमी मिळणार आहे. 

वृश्चिक रास (Scorpio Zodiac)  

प्रदोष व्रत या राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. तुमच्या अध्यात्माकडे जास्त कल वाढणार आहे. घरामध्ये काही धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. तुमच्या मेहनतीच फळ मिळणार आहे. गुंतवणुकीतून तुम्हाला चांगले आर्थिक लाभ मिळणार आहे. तुम्ही बचत करु शकणार आहात. तुम्ही तुमच्या शत्रूंचा पराभव करण्यात यशस्वी होणार आहे. विरोधक तुमचे नुकसान करण्यात अपयशी ठरणार आहेत. 

मीन रास (Pisces Zodiac) 

ज्येष्ठ नक्षत्रामुळे मीन राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरणार आहे. तुमचे नेटवर्क मजबूत करण्यात यशस्वी होणार आहात. अपूर्ण कामांमध्ये नातेवाईकाची साथ मिळणार आहे. घरगुती स्तरावर शांतता आणि सौहार्द राखून तुम्ही तणावमुक्त होणार आहात. ज्यामुळे सर्व सदस्य आनंदी असणार आहात. नोकरदार लोकांसाठी टार्गेट पूर्ण केल्यामुळे अधिकार्‍यांशी तुमचं संबंध सौहार्दपूर्ण होणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)