close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

स्वप्नातील हे ५ संकेत देतील शुभवार्ता

ज्योतिषामध्ये असे अनेक पर्याय सांगण्यात आलेत ज्यामुळे भविष्यात होणाऱ्या घटनांची माहिती मिळते. यातील एक विद्या म्हणजे स्वप्नज्योतिष. या विद्येने स्वप्नांच्या माध्यामातून भविष्यातील संकेत मिळतात. जाणून घ्या स्वप्नातील हे संकेत भविष्याबाबत काय सांगतात. 

Updated: Jun 19, 2018, 05:54 PM IST
स्वप्नातील हे ५ संकेत देतील शुभवार्ता

मुंबई : ज्योतिषामध्ये असे अनेक पर्याय सांगण्यात आलेत ज्यामुळे भविष्यात होणाऱ्या घटनांची माहिती मिळते. यातील एक विद्या म्हणजे स्वप्नज्योतिष. या विद्येने स्वप्नांच्या माध्यामातून भविष्यातील संकेत मिळतात. जाणून घ्या स्वप्नातील हे संकेत भविष्याबाबत काय सांगतात. 

१. एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात नारळाचा प्रसाद मिळताना दिसत असेल तर हा एक शुभ संकेत आहे. यामुळे नजीकच्या भविष्यात तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे. 

२. जर एखाद्या व्यक्तीच्या स्वत:च्या मृत्यूचे स्वप्न पडले असेल किंवा ती व्यक्ती स्वत:चा अंत्यसंस्काराचा विधी पाहत असेल तर हा शुभ संकेत आहे. यामुळे भविष्यात येणाऱ्या मोठ्या अडचणीपासून सुटका मिळू शकते.

३. एखादी व्यक्ती स्वप्नात डोंगरावर चढताना स्वत:ला पाहत असेल तर हाही एक शुभ संकेत आहे. येणाऱ्या काळात त्या व्यक्तीच्या आयुष्यात चांगली घटना घडणार आहे. 

४. एखादे धार्मिक कार्य करत असल्याचे स्वप्नात दिसले अथवा देवी-देवतांच्या मूर्ती दिसल्या तर शुभ वार्ता मिळू शकते.

५. स्वत:लाच स्वप्नात रडताना पाहिले असल्यास भविष्यात या व्यक्तीला शुभ वार्ता मिळण्याची शक्यता असते.