close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

जाणून घ्या रविवारी जन्मलेल्या व्यक्ती कशा असतात

रविवार हा आठवड्याचा पहिला वार असतो. वेगवेगळ्या दिवसांनुसार जन्मलेल्या लोकांचे स्वभाव वेगवेगळे असतात. 

Updated: Jun 7, 2018, 10:43 PM IST
जाणून घ्या रविवारी जन्मलेल्या व्यक्ती कशा असतात

मुंबई : रविवार हा आठवड्याचा पहिला वार असतो. वेगवेगळ्या दिवसांनुसार जन्मलेल्या लोकांचे स्वभाव वेगवेगळे असतात. याप्रमाणे रविवारी जन्मलेल्या लोकांवर भगवान सूर्याची कृपा कायम राहते. रविवारी जन्मलेल्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या सवयी इतर दिवशी जन्मलेल्या व्यक्तींच्या तुलनेत पूर्णपणे वेगळ्या असतात. या व्यक्ती कर्मठ, महत्त्वाकांक्षी, दृढ इच्छा शक्ती असलेले आणि आकर्षक व्यक्तिमत्वाच्या असतात. यांचे मन स्वच्छ असते आणि बिनशर्त प्रेम करतात. 

ज्यांचा जन्म रविवारी झालाय अशा व्यक्ती साहसी, मेहनती आणि महत्त्वाकांक्षी असतात. यांच्यासाठी आत्मसन्मान सगळ्यात महत्त्वाचा असतो. या व्यक्ती आत्मसन्मानासाठी काहीही करण्यास तयार असतात. यांना सतत टोमणे मारणे आवडत नाही. आपल्या अटींवर जगायला आवडते. यांच्या कामात कोणी दखलअंदाजी केल्यास यांना आवडत नाही. आकर्षणाचा केंद्रबिंदू राहायला त्यांना आवडते. चारही बाजूंनी लोकांनी आपल्याला विचारावे असे त्यांना सतत वाटत असते. हे आपली वाट स्वत: निवडतात आणि त्यावर चालतात. 

रविवारी जन्मलेल्या व्यक्ती असे करियर निवडतात ज्यात ते स्वत: लीडर असतात. यांना कोणाच्या हाताखाली काम करायला आवडत नाही. या दिवशी जन्मलेल्या व्यक्ती बिझनेसमन असतात. या व्यक्तींना राग आल्यास लवकर जात नाही. या व्यक्तींना आजारांचा सामना कमी करावा लागतो. मात्र यांना हृदयाचे आजार तसेच डोळ्यांशी संबंधित आजारांचा त्रास होऊ शकतो.