Rahu Gochar 2022: सव्वा वर्षे तीन राशींवर असेल राहुची कृपा, अचानक होईल आर्थिक लाभ

 राहु हा शनि नंतरचा सर्वात संथ गतीने गोचर करणारा ग्रह आहे. राहु दीड वर्षानंचर राशी बदलतो.

Updated: Jun 28, 2022, 03:11 PM IST
Rahu Gochar 2022: सव्वा वर्षे तीन राशींवर असेल राहुची कृपा, अचानक होईल आर्थिक लाभ title=

Rahu Gochar Effect : राहु हा शनि नंतरचा सर्वात संथ गतीने गोचर करणारा ग्रह आहे. राहु दीड वर्षानंचर राशी बदलतो. या वर्षी, 12 एप्रिल 2022 रोजी राहूने मेष राशीत प्रवेश केला आहे. आता राहु 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत या राशीत असणआर. राहु-केतू या ग्रहांचे वैशिष्ट्य म्हणजे ते नेहमी उलट दिशेने संक्रमण करतात. म्हणजेच मीन राशीकडून मेष राशीकडे प्रवास करतात. राहु बाबत सामान्यत: लोकांच्या मनात भीतीची भावना असते. परंतु मेष राशीतील राहु तीन राशीच्या लोकांना शुभ परिणाम देईल.

राहुची तीन राशींवर असेल कृपा

मिथुन: मिथुन राशीच्या लोकांसाठी राहु संक्रमण चांगलं राहील. या लोकांना ऑक्टोबर 2023 पर्यंत भरपूर पैसे मिळतील. तसेच अनपेक्षित लाभही मिळतील. नोकरी-व्यवसायातही यश मिळेल. विशेषत: हा काळ व्यापाऱ्यांना खूप फायदा देईल. गुंतवणुकीसाठी चांगली वेळ आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास फायदा होईल. राजकारणात सक्रिय लोकांना हा काळ प्रगती आणि मोठे पद देईल.

कर्क: राहुचा राशी बदल कर्क राशीच्या लोकांसाठी चांगला ठरेल. नोकरीत फायदा होईल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी ऑक्टोबर 2023 पर्यंतचा काळ चांगला आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील. 

मीन: मीन राशीच्या लोकांसाठी राहूचा मेष राशीत प्रवेश धनलाभ देईल. त्यांना अचानक कुठून तरी पैसे मिळतील. यासोबतच अडकलेले पैसेही मिळतील. एकूणच तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. याशिवाय नोकरी-व्यवसायात यश मिळेल. गुप्त शत्रूंपासून दिलासा मिळेल.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS द्वारे याला मान्यता दिलेली नाही.)