Rahu Gochar 2023: 2023 मध्ये ‘या’ राशींना राहू बनवणार श्रीमंत? नवीन वर्षात मिळणार धनलाभाची संधी

Rahu Transit 2023: 2022 हे वर्ष संपण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहे. अशातच 2023 हे वर्ष कसं असेल, कोणत्या राशींवर काय परिणाम होतील, कोणाला धनलाभ होईल? या संदर्भात सविस्तर जाणून घ्या...

Updated: Dec 27, 2022, 09:42 AM IST
Rahu Gochar 2023: 2023 मध्ये ‘या’ राशींना राहू बनवणार श्रीमंत? नवीन वर्षात मिळणार धनलाभाची संधी  title=

Rahu Rashi Parivartan 2023: येत्या वर्षी 2023 मध्ये सर्व राशीसाठी नवं वर्ष कसं ठरेल कोणत्या राशीवर कसा प्रभाव राहील, मेष ते मीन राशीपर्यंत सर्व राशींवर नवीन वर्षात ग्रहांचा प्रभाव आणि उपाय कसा असेल याबाबत जाणून घेऊया. दरम्यान 2022 प्रमाणे नवीन वर्षातही अनेक ग्रहांचे संक्रमण होणार आहे. या पर्वात राहू 30 ऑक्टोबर 2023 रोजी राशी बदलणार आहे. तर याच दिवशी दुपारी 12.30 वाजता तो मेष सोडून मीन राशीत प्रवेश करेल. या राशी बदलामुळे काही राशीच्या लोकांना खूप फायदा होईल. या काळात नशिबाच्या पाठिंब्याने चांगले दिवस सुरू होतील आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल.

मेष 

ज्योतिष शास्त्रानुसार राहूचे हे संक्रमण मेष राशीच्या (Aries) लोकांसाठी विशेष फलदायी ठरणार आहे. या लोकांसाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील आणि धनप्राप्तीमुळे ते श्रीमंत होतील. नोकरीत बढतीची संधी मिळेल आणि समाजात मान-सन्मान वाढेल.

वाचा : पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा  

कर्क 

राहूच्या संक्रमणामुळे नवीन वर्षाच्या ऑक्टोबरपासून कर्क राशीच्या (Cancer) लोकांना भाग्याची साथ मिळू लागेल. हा राशी बदल या राशीच्या लोकांसाठी चांगली बातमी घेऊन येईल. नवीन वाहन आणि घर खरेदीची शक्यता आहे. व्यवसायात लाभ होईल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील.

मीन

2023 मध्ये राहू मेष राशीतून बाहेर पडून मीन राशीत (Pisces) प्रवेश करेल. मीन राशीच्या लोकांना या संक्रमणाचा विशेष फायदा होईल. धनलाभामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे. या काळात शुभवार्ताही मिळतील.

 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी 24 तास' याची खातरजमा करत नाही.)