मुंबई : रक्षाबंधन हा एक महत्त्वाच्या सण आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. भाऊ बहिणीचं रक्षण करण्यासाठी वचन देतो. काळानुसार रक्षाबंधन बदललं असलं तरी त्यामागची भावना मात्र कायम आहे. आज दोन बहिणी एकमेकींना राखी बांधतात. भाऊ नाही तर एकमेकींचं संरक्षण करतात.
या दिवशी बहीण आणि भाऊ एकमेकांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात. त्याच वेळी, भाऊ देखील बहिणीला प्रेमाने भेटवस्तू देतो. तिचे आयुष्यभर संरक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधनाचा सण भाऊ आणि बहिणीमधील अतूट प्रेम आणि पवित्र नात्याचे प्रतीक आहे.
पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. यंदा 11 ऑगस्टला रक्षाबंधन आलं आहे. त्यामुळे 11 ऑगस्टची वेळ आताच राखून ठेवा. ज्यामुळे तुम्हाला तुम्ही प्रिय बहिणीसोबत हा सण साजरा करता येईल.
हिंदू पंचागानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्ष पौर्णिमेला रक्षाबंधन सण साजरा करतात. सकाळी 10.38 मिनिटांनी शुभ मुहूर्त सुरू होईल. 12 ऑगस्ट रोजी म्हणजे शुक्रवारी सकाळी 7.5 मिनिटांनी हा शुभ काळ समाप्त होणार आहे.
राखी बांधण्यासाठीचा शुभ मुहूर्त 11 ऑगस्टला सकाळी 9 वाजून 28 मिनिटांनी सुरू होणार आहे. त्यामुळे या वेळेनंतरच राखी बांधावी. रात्री 9 वाजेपर्यंत तुम्ही राखी बांधू शकता असं सांगण्यात आलं आहे.
(Disclaimer: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे. अधिक माहिती आहे बातम्यांसाठी फॉलो करा 24 Tass.com )