11 की 12 ऑगस्ट नेमकं कुठल्या दिवशी आहे रक्षाबंधन...जाणून घ्या!

यंदा पौर्णिमा दोन दिवस आहे. त्यामुळे बहिणी संभ्रमात आहे की भावाला राखी कधी बांधायची.

Updated: Jul 16, 2022, 05:53 PM IST
11 की 12 ऑगस्ट नेमकं कुठल्या दिवशी आहे रक्षाबंधन...जाणून घ्या! title=

Raksha Bandhan 2022:  रक्षाबंधन हा बहीण भावाच्या पवित्र नात्याचा उत्सवाचा सण. हा सण श्रावण शुद्ध पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवसाला नारळी पौर्णिमा असंही म्हणतात. या सण कोळी समाजासाठी खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी कोळी लोकं समुद्रात नारळ अर्पण करतात. यंदा पौर्णिमा दोन दिवस आहे. त्यामुळे बहिणी संभ्रमात आहे की भावाला राखी कधी बांधायची.

'या' दिवशी बांधा भावाला राखी

पंचांगानुसार श्रावण महिन्यात पौर्णिमा 11 ऑगस्टला सकाळी 10.38 वाजता सुरु होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 ऑगस्ट सकाळी 7.05 मिनिटांनी संपणार आहे. त्यामुळे 11 ऑगस्टला तुम्ही रक्षाबंधन साजरे करा. 

रक्षाबंधनासाठी शुभ मुहूर्त

तारीख - 11 ऑगस्ट, गुरुवार
पौर्णिमा प्रारंभ - 11 ऑगस्ट, सकाळी 10.38 पासून
पौर्णिमा समाप्ती - 12 ऑगस्ट, सकाळी 07.05 मिनिटांनी
शुभ मुहूर्त - 11 आगस्ट सकाळी 09.28 ते रात्री 09.14 पर्यंत
अभिजीत मुहूर्त - दुपारी 12.06 ते 12.56 पर्यंत
अमृत कल - संध्याकाली 6.55 ते 8.20 पर्यंत

तर बहीण भावाच्या पवित्र नात्याचा हा सण 11 ऑगस्टला साजरा करा.