Raksha Bandhan: भावाला कोणत्या दिशेला बसवाल? राखी बांधताना किती गाठी माराल? 'ही' दिशा ठरेल शुभदायी

Raksha Bandhan 2024: रक्षाबंधन अवघ्या एका आठवड्यावर येऊन ठेपलं आहे. हिंदू धर्मात रक्षाबंधनबाबत अनेक मान्यता आहेत. त्या जाणून घेउयात.   

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 13, 2024, 01:10 PM IST
Raksha Bandhan: भावाला कोणत्या दिशेला बसवाल? राखी बांधताना किती गाठी माराल? 'ही' दिशा ठरेल शुभदायी title=
Raksha Bandhan 2024 Date what is the right direction to get Rakhi tied

Raksha Bandhan 2024: रक्षाबंधन म्हणजे भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे. रक्षाबंधनसाठी अवघा एक आठवडा उरला आहे. रक्षाबंधनवर भद्राकाळाचा लोक विचार करतात. कारण भद्रा काळत राखी बांधली जात नाही, अशी मान्यता आहे. तसंच, राखी बांधताना कोणत्या दिशेला बसायचं नाही याचेही नियम पाळले जातात. हिंदू धर्मात याचे खूप महत्त्व आहे. कारण चुकीच्या दिशेकडे तोंड करुन बसल्यावर भाऊ आणि बहिण या दोघांनाही दोष लागतो. असं म्हणतात की दोघांच्या आरोग्यावर आणि आयुष्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. 

नारळीपौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. या वर्षी 19 ऑगस्ट रोजी नारळीपौर्णिमा आहे. यावेळीही भद्राचे सावट आहे. भद्राकाळात राखी बांधणे अशुभ असते. तसंच, रक्षाबंधनाच्या दिवशी राखी शुभ मुहूर्त आणि योग्य दिशेला बसून बांधली पाहिजे. भावा आणि बहिणीने योग्य दिशेला बसूनच राखी बांधली पाहिजे. 

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला उत्तरेच्या दिशेने तोंड करुन बसावे तर भावाने पूर्वेकडे तोंड करुन बसावे. याच पद्धतीने बसून भावाच्या उजव्या हाताला राखी बांधावी. या प्रकारे राखी बांधल्यास भाऊव बहिणीच्या आयुष्यात सकारात्मक प्रभाव पडणार आहे. 

राखी बांधताना किती गाठ माराल?

भावाच्या मनगटाला राखी बांधताना तीन वेळा गाठ माराल. शास्त्रानुसार तीनवेळा गाठ मारलं शुभदायी असतं. 

राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त 

दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळाचा सावट असते. तसंच, भद्रेच्या मुहूर्तावर राखी बांधणे अशुभ मानले जाते. 18 ऑगस्ट रविवारी रात्री 2 वाजून 21 मिनिटांनी भद्रा काळ सुरू होणार आहे. तर, दुसऱ्या दिवशी 19 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनी भद्रा काळ संपणार आहे. त्यामुळं 19 सप्टेंबर रोजी 1 वाजून 25 मिनिटांनंतर राखी बांधावी.

हिंदू धर्मात भद्रा काळ अशुभ मानला जातो. या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. विवाह, मुंज, वास्तुशांती, गृहप्रवेश यासारखे शुभ कर्म करु नये. 

भद्रा काळ काय आहे?

पौराणिक कथेनुसार, भद्र ही सूर्यदेवाची कन्या आणि शनिदेवांची बहिण मानली जाते. भद्रा तीन लोकांमध्ये वास करते. म्हणजे भद्रा स्वर्गात, पाताळात आणि पृथ्वीवर वास करते. चंद्र, कर्क, सिंह, कुंभ आणि मीन राशीत अशतो. तेव्हा भद्रा पृथ्वीवर असते. अशा स्थितीत या काळात कोणतेही शुभ कार्य करायचे नसते. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )