साडेसातीमुळे 'या' राशीच्या लोकांच्या कामात येणार अडथळे

कसा असेल आजचा आपला दिवस, कोणाला मिळणार शुभ वार्ता जाणून घ्या 13 मार्चचं राशीभविष्य

Updated: Mar 13, 2021, 07:57 AM IST
साडेसातीमुळे 'या' राशीच्या लोकांच्या कामात येणार अडथळे

मुंबई: येणारा दिवस उत्तम जावा यासाठी आपला कायमच प्रयत्न असतो. पण येणाऱ्या दिवसात समस्या कोणत्या येणार याची पूर्वकल्पना मिळाली तर त्या टाळता येऊ शकतात. त्यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.

मेष- आज आपलं नुकसान होण्याची शक्यता आहे. वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आपलं आरोग्य बिघडणार नाही याची काळजी घ्या. 

वृषभ- आज बोलताना काळजी घ्या. व्यवसाय आणि कामाच्या ठिकाणी तसा दिवस बरा असेल मात्र सावधानी बाळगावी लागेल. 

मिथुन- आरोग्याकडे लक्ष द्या. लग्न तुटण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कोणतीही जोखीम उचलू नका. 

कर्क- प्रेमात समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. ओटीपोटाच्या समस्या जाणवतील. 

सिंह-  आज आपल्याला अनेक अडचणी येतील. त्यामुळे हार न मानता आपले प्रयत्न कायम सुरू ठेवा. प्रेम प्रकरणांमध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. 

कन्या- मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. आरोग्य चांगलं राहिल मात्र मनस्थिती द्विधा असल्यानं अस्वस्थ वाटेल. 

तूळ- आरोग्य बिघडण्याची दाट शक्यता आहे. जमिनीशी संबंधित कामात अडथळे येतील. 

वृश्चिक- आज अनेक लोक आपली मदत करतील. व्यवसायात प्रगती होईल. 

धनु- डोळ्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. प्रेमात आजचा दिवस आपला खूप सुंदर जाईल. 

मकर- बैचेन आणि मन विचलित होणाऱ्या गोष्टी आज घडतील. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा. 

कुंभ- आपली वेळ चांगली नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना काळजी घ्या. शारीरिक समस्यांचा सामना करावा लागेल. 

मीन- आर्थिक स्थिती बळकट होईल. अचानक धनलाभ होऊ शकतो. वादविवादापासून दूर राहा.

Tags: