Samsaptak Yog : दशकांनंतर शनी-मंगळ यांची अशुभ युती; 'या' राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर

Samsaptak Yog : जुलैमध्ये मंगळ सिंह राशीत प्रवेश केला आणि शनि कुंभ राशीमध्ये आहे. अशा परिस्थितीत या योगातील अनेक राशींसाठी हा काळ अडचणींचा असणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तींना यावेळी नकारात्मक परिणाम मिळू शकतात.

सुरभि जगदीश | Updated: Jul 27, 2023, 09:34 PM IST
Samsaptak Yog : दशकांनंतर शनी-मंगळ यांची अशुभ  युती; 'या' राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर title=

Samsaptak Yog : जोतिष्यशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाच्या एका ठराविक काळानंतर राशीबदल करतो. एक निश्चित वेळ आहे. ग्रह त्यांच्या निश्चित वेळेत गोचर करून सर्व राशींच्या जीवनावर परिणाम करतात. सध्या सुरु असलेल्या जुलै महिन्यात मंगळ ग्रहाने गोचर केलं. मंगळाने सिंह राशीत प्रवेश केला असून 18 ऑगस्टपर्यंत तो या राशीत राहणार आहे. 

ज्योतिषशास्त्रानुसार, जुलैमध्ये मंगळ सिंह राशीत प्रवेश केला आणि शनि कुंभ राशीमध्ये आहे. यावेळी दोन्ही ग्रह या स्थितीत असताना समसप्तक राजयोग तयार होतोय आहे. अशा परिस्थितीत या योगातील अनेक राशींसाठी हा काळ अडचणींचा असणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तींना यावेळी नकारात्मक परिणाम मिळू शकतात.

कन्या रास

कन्या राशीच्या कार्यक्षेत्रात समसप्तक योगाचा प्रभाव दिसून येणार आहे. या दरम्यान अस्वस्थता वाढणार आहे. एवढेच नाही तर आईच्या तब्येतीची चिंता राहणार आहे. जुनी दुखणी पुन्हा डोकं वर काढण्याची शक्यता आहे.  कामाच्या ठिकाणी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात अधिक खर्च होईल. 

तूळ रास

शनी आणि मंगळ समोरासमोर आल्याने या राशीच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागेल. भाऊ आणि मित्रांकडून एखादी वाईट बातमी ऐकायला मिळू शकते. वडिलांच्या तब्येतीची चिंता राहणार आहे. आर्थिक स्थिती ढासळण्याची शक्यता आहे. कोणतंही नवीन कार्य सुरू करण्याचा विचार करत असाल तर तो विचार पुढे ढकलावा.

मकर रास

ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे. कौटुंबिक कामात खर्च वाढेल. जुने शत्रू आणि रोग समोर येतील. बहिणीची प्रकृती बिघडू शकते. आर्थिक तंगीच्या समस्येलाही सामोरे जावे लागू शकते. मालमत्तेशी संबंधित कोणत्याही वादाला सामोरं जावं लागू शकतं.

मीन रास

शनी आणि मंगळ समोरासमोर आल्यामुळे मीन राशीच्या लोकांच्या अडचणी वाढणार आहेत. आईच्या प्रकृतीची चिंता वाढू शकते. घराबाबत तणावाची परिस्थिती राहील. वडिलांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च होऊ झाल्याने बजेट बिघडू शकतं.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )