Mangal Shani Samsaptak Yoga : वैदिक ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आज मंगळ ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केला आहे. मंगळ गोचर झाल्यानंतर कुंडलीतील सप्तम घरात शनी कुंभ राशीत विराजमान आहे. त्यामुळे सप्तम पूर्ण दृष्टीकोनातून मंगळ आणि शनी एकमेकांना पाहणार आहे. त्यामुळे अशा स्थिती समसप्तक योग तयार झाला आहे.
मंगळ ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केल्यामुळे सिंह उग्र स्थितीत आहे. त्यामुळे मंगळ आणि शनी यांच्या स्थितीमुळे तयार होणाऱ्या या योगाला वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय शुभ मानलं जातं. संसप्तक योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात 18 ऑगस्टपर्यंत उलथापालथ होणार आहे. (samsaptak yog being formed july 1 these 5 zodiac signs need to be careful)
संसप्तक योगामुळे या राशीच्या लोकांना खूप सावध राहण्याची गरज आहे. या दिवसांमध्ये वाहन चालवून नका, अपघात होण्याची शक्यता आहे. लव्ह लाइफमध्ये गोंधळ निर्माण होईल. तब्येतीकडे लक्ष द्या. पोटासंबंधित समस्या त्रास देणार आहे. खाण्यावर नियंत्रण बाळगा.
संसप्तक योगा हा कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात भूंकप आणणार आहे. या लोकांनी या काळात बोलताना काळजी घ्यावी अन्यथा मोठ्या संकटात सापडू शकतात. होणारी कामं रखडणार आहेत. कार्यक्षेत्रात समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. वेळेत काम पूर्ण करण्यावर लक्ष द्या अन्यथा संकटात सापडाल.
संसप्तक योग हा या राशींच्या आयुष्यात वित्तहानी घेऊन आला आहे. तुमचं बँक बलेन्स बिघडणार आहे. या राशीच्या लोकांना 18 ऑगस्टपर्यंत खर्च टाळाचा आहे. अनावश्यक खर्च करु नका. कुठल्याही आर्थिक व्यवहार करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आरोग्याकडेही दुर्लक्ष करु नका.
संसप्तक योग या राशीसाठी नकारात्मक परिणाम घेऊन आला आहे. अपघात होण्याची शक्यता आहे. कुंटुंबात सदस्यांसोबत मतभेद होणार आहे. घरातील वातावरण तणावपूर्ण असेल. उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होणार असल्याने तुम्ही चिंतेत असणार आहात. निर्णय घेताना परिपूर्ण विचार करुन घ्या.
संसप्तक योग मीन राशीसाठी धोकादायक असणार आहे. कार्यक्षेत्रात प्रत्येक कामात अडथळा येणार असून सहकारी तुमच्या मार्गात समस्या निर्माण करणार आहे. आर्थिक स्थिती बिघडणार आहे. 18 ऑगस्टपर्यंत तुम्ही विचार, वागणूक आणि अहंकारावर ताबा बाळगा. नाही तर तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल.