Samsaptak Yoga : मंगळ-शनी येणार समोरासमोर; धोकादायक योगाने 'या' राशींचं जगणं होणार मुश्किल

Samsaptak Yoga : सिंह राशीत मंगळाच्या प्रवेशाने शनि आणि मंगळामुळे समसप्तक योग तयार होणार आहे. शनि प्रतिगामी अवस्थेत असून मंगळ समोरासमोर असल्यामुळे धनहानी होण्याची शक्यता असते. या दरम्यान समसप्तक योग तयार होतोय.

सुरभि जगदीश | Updated: Jun 20, 2023, 09:09 PM IST
Samsaptak Yoga : मंगळ-शनी येणार समोरासमोर; धोकादायक योगाने 'या' राशींचं जगणं होणार मुश्किल title=

Samsaptak Yoga : ज्योतिष शास्त्रानुसार पुढील महिन्यात 1 जुलै रोजी मंगळ सिंह राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ हा अग्नि तत्वाचा ग्रह आहे आणि सिंह देखील अग्नि तत्वाचे चिन्ह मानलं जातं. अशा स्थितीत मंगळ जेव्हा सिंह राशीत प्रवेश करेल तेव्हा तो अधिक उग्र होणार आहे. या काळात सिंह राशीत मंगळाच्या प्रवेशाने शनि आणि मंगळामुळे समसप्तक योग तयार होणार आहे.

या काळात मंगळ आणि शनि समोरासमोर असल्यामुळे काही राशींच्या लोकांवर प्रतिकूल परिणाम दिसून येणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, शनि प्रतिगामी अवस्थेत असून मंगळ समोरासमोर असल्यामुळे धनहानी होण्याची शक्यता असते. या दरम्यान समसप्तक योग तयार होतोय. दरम्यान या काळामध्ये कोणत्या राशींच्या व्यक्तींना काळजी घ्यावी लागणार आहे, हे पाहुयात.

मेष रास

मंगळ आणि शनि समोरासमोर असल्यामुळे या राशीच्या लोकांवर प्रतिकूल परिणाम दिसून येणार आहेत. या काळात पोटाशी संबंधित समस्या असू शकतात. कामाच्या ठिकाणी देखील वातावरण चांगलं राहणार नाही. प्रेमसंबंधांसाठीही हा काळ अनुकूल नाहीये. 

कर्क रास

मंगळ आणि शनी समोरासमोर असल्यामुळे समसप्तक योग तयार होणारे. अशा स्थितीत या राशींच्या व्यक्तींचं बोलणं थोडं कडवट होऊ शकतं. यावेळी तुम्हाला बोलण्यावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. गुंतवणूक किंवा पैशांचा मोठा व्यवहार अजिबात करू नये. वाद घालणे टाळा अन्यथा तुमच्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो. नातेसंबंधांची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. कुटुंबामध्ये कलह होण्याची दाट शक्यता आहे.

कन्या रास

या राशीच्या लोकांना आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे. काही छोट्या कारणासाठी पैसा खर्च करावा लागू शकतो. कोणत्याही बाबतीत खूप काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. परदेशात जाण्याचा विचार करणार्‍यांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कोणाकडूनही पैसे उसने घेऊ नयेत.

मकर रास

मकर राशीच्या लोकांना यावेळी शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. कुटुंबामध्ये अशांतता निर्माण होणार आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये कमी प्रेम दिसून येऊ शकतं. कौटुंबिक वादात बाहेरील व्यक्तींना हस्तक्षेप करू देऊ नये. कामाच्या ठिकाणी इतर लोकं तुमच्यावर कुरघोडी करण्याची शक्यता आहे. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x