Ketu Gochar 2023 : ज्योतिष शास्त्रानुसार केतूला मायावी ग्रह मानले जाते. हा ग्रह नेहमी वक्री चाल चालतो. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत केतूची स्थिती अशुभ असते तेव्हा त्या व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. केतू नेहमी दीड वर्षात राशी बदलतो.
केतू ग्रह सध्या तूळ राशीत असून येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये तो कन्या राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये केतूचा प्रभाव शनी आणि राहूच्या प्रभावाप्रमाणेच आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, केतू हा व्यक्तींना चांगला आणि वाईट दोन्ही परिणाम देते. कुंडलीमध्ये केतू ज्या स्थानावर राहतो त्याच घरानुसार परिणाम देतो.
केतू ग्रह ऑक्टोबरमध्ये गोचर करणार असून या राशी बदलामुळे काही राशीच्या लोकांवर त्याचा शुभ प्रभाव दिसून येतो. चला जाणून घेऊया कोणत्या राशींवर या गोचरचा सकारात्मक परिणाम होणार आहे.
वृषभ राशीच्या लोकांसाठी केतू ग्रहाचं गोचर लाभदायक ठरणार आहे. या काळामध्ये तुमचं आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे. याशिवाय मानसिक तणावातून मुक्ती मिळू शकणार आहे. व्यावसायिकांचीही भरभराट होण्याीची शक्यता आहे. कुठेतरी लांबच्या प्रवासाला जाता येणार आहे. केतूच्या गोचरमुळे वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होणार आहे. भागीदारीत कोणतंही काम करायचं असेल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अधिक शुभ ठरणार आहे.
सिंह राशीच्या लोकांसाठी केतूचं गोचर फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी फिरायला जाऊ शकता. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ शुभ आहे. वैयक्तिक कामं शांततेने पूर्ण होतील. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. जीवनात अनेक क्षेत्रांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.
केतूच्या गोचरमुळे धनु राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये मोठं यश मिळवून देणार आहे. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. त्याचसोबत कामाच्या ठिकाणी तुमचं भरपूर कौतुक होणार आहे. पालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. जोडीदाराशी असलेले संबंध सुधारतील.
केतूचं गोचर मकर राशीच्या लोकांसाठी धन लाभ घेऊन येणार आहे. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होणार आहेत. नोकरदार लोकांना मोठी जबाबदारी मिळू शकते. वैवाहिक जीवनात गोडवा येणार आहे. तुम्हाला चांगला नफा मिळणार. कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदणार आहे.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )