मुंबई : हिंदू धर्मात अशा अनेक समजुती आहेत, ज्यांना काही लोक फक्त अंधश्रद्धा मानतात. परंतु ज्योतिष शास्त्रानुसार, या श्रद्धा प्राचीन काळापासून मानवी जीवनावर परिणाम करत आहेत. यातील एक समज म्हणजे मंदिरातून शूज आणि चप्पल चोरीला जाणं.
ज्योतिष शास्त्राच्या म्हणण्यानुसार, मंदिरातून शूज आणि चप्पल चोरीला जाणं हे शुभ मानलं जातं. घरातील जुने लोक या समजुती मानतात. असं मानलं जातं की, जर शनिवारी मंदिरातून तुमचे बूट आणि चप्पल चोरीला गेली तर ते तुमच्यासाठी शुभ असू शकतं.
ज्योतिष शास्त्रामध्ये असं सांगण्यात येतं की, जर शनिवारी मंदिरातून तुमचे बूट किंवा चप्पल चोरीला गेली तर ते तुमच्यासाठी खूप शुभ आहे. शनिवारी मंदिरातून शूज आणि चप्पल चोरीला जाण्याचा अर्थ असा की, तुमचा वाईट काळ लवकरच संपणार आहे. तुमच्या जीवनात सुख-समृद्धी येणार आहे. चोरीला गेलेली चप्पल किंवा शूज आपल्या सर्व समस्या सोबत घेऊन जातं असेही म्हटले जाते.
ज्योतिष शास्त्रामध्ये असं मानलं जातं की, शनिदेव व्यक्तीच्या पायात वास करतात. पायाशी शनिचा संबंध असल्याने शूज आणि चप्पल हे देखील शनिदेवाचे कारक बनतात. म्हणूनच जर कोणाचे बूट आणि चप्पल चोरीला गेले किंवा दान केले तर शनिदेवाची कृपा तुमच्यावर राहते आणि ते प्रसन्न राहतात.
ज्योतिष शास्त्रात असं मानलं जातं की, जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि अशुभ स्थितीत असेल आणि चांगलं फळ देत नसेल, तर त्या व्यक्तीला केलेल्या कामात यश मिळत नाही. अशा स्थितीत शनिवारी मंदिरातून तुमचे बूट आणि चप्पल चोरीला गेली तर ते तुमच्यासाठी शुभ आहे.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)