Saturday Panchang : पितृ पक्षातील आज संकष्टी चतुर्थीसह शश योग! पूजेसाठी शुभ मुहूर्त चंद्रोदयाची वेळ काय?

21 September 2024 Panchang : आज भाद्रपद कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

नेहा चौधरी | Updated: Sep 21, 2024, 07:10 AM IST
Saturday Panchang : पितृ पक्षातील आज संकष्टी चतुर्थीसह शश योग! पूजेसाठी शुभ मुहूर्त चंद्रोदयाची वेळ काय? title=
Saturday panchang 21 September 2024 panchang in marathi Sankashti Chaturthi

Panchang 21 September 2024 in marathi : पितृ पक्ष पंधरवडा सुरु आहे. पितृ पक्ष पितरांना प्रसन्न करण्यासाठी विधी केले जातात. एवढंच नाही तर पितृदोषापासून मुक्तीसाठी उपाय केले जातात. आज पितृ पक्षातील संकष्टी चतुर्थी आहे. गणेशाच व्रत म्हणजे सर्व संकटं दूर होतात अशी मान्यता आहे. गणेश संकष्टी चतुर्थीचं व्रत हे चंद्राचं दर्शन करुन सोडलं जातं. त्यामुळे जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि शुभ मुहूर्त. 

आज पंचांगानुसार (Panchang Today) भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. तर श्राद्ध पक्षातील चौथी तिथी आहे. पंचांगानुसार  शश राययोगसह हर्षन योग, मालव्य योग आणि भरणी नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र मेष राशीत आहे. (Saturday Panchang)  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. शनिवार हा दिवस शनिदेव आणि हनुमानजीला समर्पित आहे. आज संकष्टी असल्याने गणरायाची पूजा करण्यात येणार आहे. अशा या शनिवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (Saturday panchang 21 September 2024 panchang in marathi Sankashti Chaturthi) 

पंचांग खास मराठीत! (21 September 2024 panchang marathi)

वार - शनिवार 
तिथी - चतुर्थी - 18:15:57 पर्यंत
नक्षत्र - भरणी - 24:36:28 पर्यंत
करण - भाव - 07:43:21 पर्यंत, बालव - 18:15:57 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - व्याघात - 11:35:27 पर्यंत

सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - 06:09:07
सूर्यास्त -18:18:23
चंद्र रास - मेष
चंद्रोदय - 20:30:00
चंद्रास्त - 09:31:59
ऋतु - शरद

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 12:09:15
महिना अमंत - भाद्रपद
महिना पूर्णिमंत - आश्विन

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 06:09:07 पासुन 06:57:45 पर्यंत, 06:57:45 पासुन 07:46:22 पर्यंत
कुलिक – 06:57:45 पासुन 07:46:22 पर्यंत
कंटक – 11:49:27 पासुन 12:38:04 पर्यंत
राहु काळ – 09:11:27 पासुन 10:42:36 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 13:26:41 पासुन 14:15:18 पर्यंत
यमघण्ट – 15:03:55 पासुन 15:52:32 पर्यंत
यमगण्ड – 13:44:55 पासुन 15:16:04 पर्यंत
गुलिक काळ – 06:09:07 पासुन 07:40:17 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 11:49:27 पासुन 12:38:04 पर्यंत

दिशा शूळ

पूर्व

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद

चंद्रबल  

मेष, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)