Surya Shani Yuti: शनी-सूर्याची युती ठरणार धोकादायक; 'या' राशींच्या आयुष्यात होणार उलथा-पालथ?

Sun-Saturn Yuti: सूर्य आणि शनीच्या संयोगामुळे काही राशीच्या लोकांना आरोग्य, मान-सन्मान तसेच धनाची हानी होऊ शकणार आहे. यावेळी कामाच्या ठिकाणी समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.

सुरभि जगदीश | Updated: Feb 13, 2024, 07:35 AM IST
Surya Shani Yuti: शनी-सूर्याची युती ठरणार धोकादायक; 'या' राशींच्या आयुष्यात होणार उलथा-पालथ? title=

Sun-Saturn Yuti: वैदिक ज्योतिषानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. यामध्ये सूर्य आणि शनि हे शत्रू ग्रह मानले जातात. अशा स्थितीत हे दोन ग्रह एकत्र आले तर अनेक राशींवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडताना दिसतो. आज म्हणजेच 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:31 वाजता सूर्य कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. मुख्य म्हणजे या ठिकाणी शनी आधीच उपस्थित आहे. अशा स्थितीत सूर्य आणि शनीचा संयोग होणार आहे.

सूर्य आणि शनीच्या संयोगामुळे काही राशीच्या लोकांना आरोग्य, मान-सन्मान तसेच धनाची हानी होऊ शकणार आहे. यावेळी कामाच्या ठिकाणी समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया शनी-सूर्याच्या युतीमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना त्रास होणार आहे. 

वृश्चिक रास

या काळात तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. कामातील समस्यांमुळे तुम्ही नोकरी बदलण्याचा विचारही करू शकता. तुम्ही कोणतेही काम पूर्ण एकाग्रतेने करू शकत नसाल तर तुमचे लक्ष्य साध्य होणार नाही.
यावेळी पैशाची कमतरता भासणार नाही पण बचत करू शकणार नाही. तुम्हाला मानसिक तणावाचाही सामना करावा लागू शकतो. वैवाहिक जीवनातील सुख कमी होऊ शकतं.

सिंह रास

शनी-सूर्याच्या युतीमुळे तुमच्या नातेसंबंधांवर परिणाम होऊ शकतो. कोणत्याही शुभ कार्यक्रमाचे आयोजन करू नका. प्रेमप्रकरणात किंवा मित्रांसोबत भांडणे होऊ शकतात. करिअरच्या दृष्टिकोनातूनही हा काळ योग्य नाही. वादांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. नोकरदार लोकांना नोकरीत वरिष्ठांसोबत वादाला सामोरे जावे लागू शकते. 

कर्क रास

शनी-सूर्याच्या युतीमुळे तुम्हाला तणावाचा अनुभव येऊ शकतो. तुम्ही तुमच्या कामाबद्दल जितके सावध राहाल तितके चांगले होईल. व्यवसायात अडचणी येऊ शकतात. रागावर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे ठरेल. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये काही अडचणींचा सामना करावा लागेल. अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. एखादा जुना आजार तुम्हाला पुन्हा त्रास देऊ शकतो. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)