Mauni Amavasya 2023 : आज शनिवार आणि वर्षातील पहिली अमावस्या आहे. शनिवारी अमावस्या आल्यामुळे या अमावस्याला शनिश्चर अमावस्या म्हटली जाते. या वेळी दुहेरी योग आहे. ही अमावस्या खूप खास आहे. कारण 20 वर्षांनंतर शुभ योग आला आहे. माघी अमावस्या म्हणजे मौनी अमावस्यादेखील आहे. पौष अमावस्या आणि पौर्णिमा हे दोन्ही दिवस स्नान आणि दान करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. मौनी अमावस्येला मौन, व्रत, श्राद्ध आणि दान केल्याने दु:ख, दारिद्र्य, कालसर्प, पितृदोष दूर होतात, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. ही अमावस्या अजून खास आहे कारण, या तिथीला शनि, सूर्य आणि शुक्र यांच्या संयोगामुळे 30 वर्षांनंतर खापर योग तयार होत आहे. (Shani Amavasya January 2023 Mauni Amavasya 2023 totke upay and remedies 21 january 2023 saturday puja muhurat vidhi daan time in marathi)
माघ कृष्णपक्ष अमावस्या तिथी सुरुवात- शनिवार 21 जनवरी, सकाळी 06:17 वाजेपासून
माघ कृष्णपक्ष अमावस्या तिथी संपणार - रविवार 22 जनवरी, पहाटे 02:22 वाजता
शनिवारीच म्हणजे आजचं स्नान-दान, पितरांचं श्राद्ध आणि पूजा करणे शुभ आहे, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
आजच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर पितरांच्या नावाने दक्षिण दिशेला दिवा लावा. हिंदू शास्त्रानुसार अशी मानता आहे की, दक्षिण दिशेकडून पूर्वज पृथ्वीवर येतात.
आज पिठात तिळ मिसळून पोळी बनवून गायीला खाऊ घाला. असं केल्यामुळे घरात सुख शांतीसोबतच समृद्धीही नांदते आणि पितरांचा आशीर्वाद मिळतो.
अमावस्याच्या दिवशी पिंपळाची पूजा करणे शुभ मानलं जातं. दारिद्र दूर करण्यासाठी पिंपळाची पूजा करावी. तुळशीची पूजा करा आणि सूर्यदेवाला दुधासोबत जल अर्पण करा.
शास्त्रात असं सांगण्यात आलं आहे की, मौनी अमावस्याच्या दिवशी दुधाच्या ग्लासमध्ये आपला चेहऱ्या पाहावा आणि नंतर हे दूध काळ्या कुत्र्याला द्यावं. असं केल्यामुळे तुमच्या कुंडलीत अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो.
संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की कापसाऐवजी लाल रंगाचा धागाने दिवा लावावा. या दिव्याची कुंकू लावून पूजा करा. यामुळे लक्ष्मी कायम तुमच्या घरात राहते.
मौनी अमावस्येला शिवलिंगाची विधिवत पूजा करा. पूजेत शिवलिंगावर काळ्या तिळासह 5 लवंगा अर्पण करा. असं केल्यामुळे तुमच्यावरील आर्थिक संकट दूर होईल, अशी शास्त्रात मान्यता आहे.
मौनी अमावस्येच्या दिवशी जवळच्या विहिरीत दूध, काळे तिळ आणि काही लोखंडाचे तुकडे अर्पण करा. हे करत असताना एका गोष्टीची काळजी घ्या. हा उपाय करताना तुम्हाला कोणीही पाहू नये. हा उपाय केल्यास कुटुंबावरील सर्व संकट नाहीसे होती.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)