Vish Yog : आजपासून सव्वा दोन दिवस विषयोग, तुमच्या राशीसाठी घातक?

Vish Yog 2023 Effect : आजपासून सव्वा दोन दिवस काही राशींना सावध राहवं लागणार आहे. कारण वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज अशुभ अशा विषयोग आहे.

Updated: Jul 6, 2023, 05:45 AM IST
Vish Yog : आजपासून सव्वा दोन दिवस विषयोग, तुमच्या राशीसाठी घातक? title=
shani chandra Yuti in Aquarius kumbh making vish yog 6 july these zodiac signs financial effect

Vish Yog 2023 Effect : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या स्थितीमुळे कुंडलीत अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होतात. न्यायदेवता शनि देवाची सगळ्या जाचकाला भीती वाटते. सध्या शनीदेव स्वगृही कुंभ राशीत असल्याने काही राशींची साडेसाती सुरु आहे. शनी हा सर्वात संथ गतीने एका घरातून दुसऱ्या घरात प्रवेश करतो. असा स्थिती लवकर शनीदेव आणि चंद्र ग्रहाची भेट होणार आहे. शनी आणि चंद्राच्या मिलनाने (Shani Chandra Yuti 2023) अशुभ योग जुळून आला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हा सर्वाधिक घातक असा योग आहे. 

आज दुपारी  1 वाजून 38 मिनिटांनी चंद्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. चंद्र कुंभ राशीत  8 जुलैपर्यंत असणार आहे. 8 जुलैला बुध गोचरसोबतच पुन्हा चंद्र गोचर करणार आहे. 8 जुलै शनिवारी चंद्र दुपारी 2 वाजून 57 मिनिटांनी कुंभ राशतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहे. अशामध्ये सव्वा दोन दिवस काही राशींना विषयोगाचा सामना करावा लागणार आहे. (shani chandra Yuti in Aquarius kumbh making vish yog 6 july these zodiac signs financial effect )

'या' राशींनी राहवं सावधान 

कन्या (Virgo)

कुंभ राशीच शनी आणि चंद्राच्या भेटीमुळे तयार झालेल्या विषयोग हा कन्या राशीच्या लोकांसाठी अतिशय घातक ठरणार आहे. घर आणि कार्यक्षेत्राच्या ठिकाणी काही कारण नसणार वादविवाद होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचं आहे. अगदी कोर्टाची पायरी चढण्याची वेळ तुमच्यावर ओढवू शकते. विनाकारण तुमचा खर्च होऊ शकतो. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)