Shani Dev : 30 वर्षांनंतर शनीबाबत मोठा योग , 'या' राशींच्या लोकांना फायदा तर यांना त्रास

Shani Dev : शनी ग्रह अडीच वर्षांतून एकदा राशी बदलतो आणि त्याचे राशीचक्र साधारण 30 वर्षांत पूर्ण होते. 17 जानेवारी 2023 रोजी शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे उलटफेर दिसून येत आहे.  

Updated: Nov 19, 2022, 11:11 AM IST
Shani Dev : 30 वर्षांनंतर शनीबाबत मोठा योग , 'या' राशींच्या लोकांना फायदा तर यांना त्रास title=

Shani Gochar 2023: ज्योतिषशास्त्रानुसार शनी दर अडीच वर्षांनी आपली रास बदलत असतो. त्यामुळे शनी राशीचक्र पूर्ण होण्यासाठी 30 वर्षांचा कालावधी लागतो. आता 30 वर्षानंतर शनिदेव कुंभ राशीत प्रवेश (Shani Gochar) करणार आहेत.  त्यामुळे काहींचा याचा चांगला फायदा होणार आहे तर काहींसाठी त्रासदायक काळ असणार आहे. (Shani Transit In Kumbh)

शनी मकर राशीतून कुंभ राशीत 

 शनीचा (Shani Dev) कुंभ राशीत प्रवेश होताच काही राशींना जबरदस्त लाभ होईल, तर काही लोकांच्या अडचणी वाढू लागतील. पंचागानुसार पुढील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये शनिची राशी बदलणार आहे. 17 जानेवारी 2023 रोजी शनी मकर राशीतून कुंभ राशीत जाईल.  30 वर्षानंतर शनिदेव त्याच्या मूळ म्हणजे कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. कुंभ राशीत शनीच्या संक्रमणामुळे कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे, ते जाणून घ्या. (अधिक वाचा - तुळशीच्या सुकलेल्या पानांचे हे उपाय बदलेल नशीब, लक्ष्मीच्या आशीर्वादाने नेहमी भरलेली राहिल तिजोरी)

अनेकांना शनीची पीडा जाणवते. शनी ग्रह त्रासदायक ठरतो. त्यामुळे शनीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करावे लागतात. तसेच शनीला कर्म आणि लाभाचे अधिकार दिले आहेत, राजकारण, तंत्र, तेल, खनिजे यांचा कारक असल्याचे सांगितले जाते. शनिदेवाच्या कृपेशिवाय कोणीही व्यक्ती उच्च पदावर विराजमान होऊ शकत नाही, असे सांगितले जाते.  

 या राशीच्या लोकांना शनीची साडेसती

ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार, शनिदेव साधारण 30 वर्षांनी कुंभ राशीत प्रवेश करत आहे. शनीचा कुंभ राशीत प्रवेश होताच कुंभ, मकर, मीन, कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांना शनीची साडेसती सुरु होईल. त्यामुळे या राशींच्या लोकांसाठी पुढील काळ हा त्रासदायक आहे.
 
कुंभ राशित शनी गोचर होत असल्याने कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर शनीची शय्या होईल. ज्याच्या प्रभावामुळे या राशींना पैसा आणि आरोग्याशी संबंधित समस्या येऊ शकतात. साडेसातीमुळे पीडित राशीच्या लोकांना आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो. या दोन्ही राशीच्या लोकांवर शनिचा प्रभाव आहे. त्यांना नोकरी आणि व्यवसायात नुकसान होऊ शकते.  त्यामुळे हाती पैसा असणार नाही. तसेच आरोग्यही जपावे लागणार आहे.

या राशीच्या लोकांना अच्छे दिन सुरु

 दरम्यान, शनी गोचरमुळे काही राशींच्या लोकांना त्रास होणार असला तरी काही राशींच्या लोकांचा  शनी गोचरचा खूप मोठा लाभ देखील होणार आहे. कुंभ राशीत शनी गोचर झाल्यानंतर  मेष, वृषभ, कन्या आणि धनु या राशीच्या लोकांचं भाग्य खुलणार आहे.  या राशीच्या लोकांचा दिवस चांगला जाणार असून प्रत्येक कामात शुभ योग आहे. यामुळे या राशींच्या लोकांच्या संपत्तीत वाढ होणार आहे.

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)