Shani Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतो. यामध्ये शनीदेवाच्या राशी बदलाला खूप महत्त्व दिलं जातं. नऊ ग्रहांपैकी शनी हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. शनीदेवांनी एकदा राशी बदलली की ते एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतात. सध्या शनिदेव स्वतःच्या राशीत कुंभ राशीत आहेत.
शनीदेव त्यांच्या कुंभ राशीमध्ये 29 मार्च 2023 रोजी रात्री 11.01 पर्यंत ते या चिन्हात बसून राहतील. अशा स्थितीत शनीच्या या संक्रमणाने काही राशींच्या व्यक्तींना भरपूर फायदा होणार आहे. 2025 पर्यंत शनीच्या या संक्रमणामुळे कोणत्या राशींचं नशीब उजळणार आहे ते पाहुयात.
शनीदेवाच्या गोचरमुळे या राशीच्या व्यक्तींना फायदा मिळणार आहे. या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. तुम्हाला नोकरीत बढती मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. कर्जातून मुक्ती मिळू शकते. व्यवसायातही जोखीम घेणं फायद्याचं ठरेल. दुसऱ्या ठिकाणी नोकरी मिळू शकते. यावेळी तुम्हाला मुलाच्या बाजूने काही चांगली बातमी मिळू शकते.
या राशीत शनी पाचव्या आणि सहाव्या घराचा स्वामी आहे. यावेळी या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकणार आहे. शनी बलवान असल्यामुळे प्रत्येक काम योग्य होणार आहे. यासोबतच तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यशासह आर्थिक लाभ मिळू शकतात. तुम्हाला मुलाच्या बाजूने काही चांगली बातमी मिळू शकते. या काळात तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली असणार आहे.
शनीदेवाच्या गोचरमुळे आर्थिक, शारीरिक आणि मानसिक समस्यांपासून मुक्ती मिळू शकणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद मिळणार आहे. मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. जीवनसाथीच्या माध्यमातून धनलाभ होऊ शकतो. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे.
शनीदेवाच्या गोचरमुळे या राशीच्या लोकांची शनीच्या साडेसातीपासून पूर्णपणे सुटका झालीये. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंदच येऊ शकतो. प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. व्यवसायात भरपूर यश मिळेल तसेच आर्थिक लाभ होईल. कामाच्या ठिकाणीही तुमच्या कामाचे कौतुक होईल. पूर्वीपेक्षा खर्चावर अधिक नियंत्रण राहील.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )