Shani Jayanti 2023 Date : वैदिक ज्योतिषशास्त्रात सर्व नऊ ग्रहांमध्ये शनीला विशेष महत्त्व आहे. कारण शनिदेव हा आपल्याला आपल्या कर्माची फळ देतो. चांगली कर्म केल्या चांगली आणि वाईट कर्म केल्या वाईट फळ देतो. अनेकांवर शनिदेवाची वक्रदृष्टी असते. तर काही लोकांना शनिदेवाचा आशिर्वाद असल्यास तो राजासारखा जगतो. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव हा आर्थिक, मानसिक आणि शारीरिक सुखाचा कारक मानला जातो. म्हणून शनिदेवाची उपासना केली जाते. अशा शनिदेवाची जयंती कधी आहे, हे तुम्हाला माहिती आहे.
खरं तर वर्षातून दोन वेळा शनि जयंती साजरी केली जाते. एक वैशाख आणि दुसरी ज्येष्ठ महिन्यात येते. या वर्षाची शनि जयंतीची तारीख, शुभ मुहूर्त आणि उपाय याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
यंदा शनि जयंती दक्षिण भारतात एका तारखेला आणि उत्तर भारतात एका तारखेला साजरी करण्यात येणार आहे. दक्षिण भारता अमावस्येला म्हणजे 20 एप्रिल 2023 ला साजरी करण्यात येणार आहे. तर उत्तर भारतात ज्येष्ठ अमावस्येला म्हणजे 19 मे 2023 ला साजरी करण्यात येणार आहे.
पंचांगानुसार, वैशाख अमावस्या (Vaishakh Shani Jayanti 2023) तिथी 19 एप्रिल 2023 ला सकाळी 11.23 वाजता सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी 20 एप्रिल 2023 ला सकाळी 09.41 वाजेपर्यंत असणार आहे. यावर्षी वैशाख अमावस्येलाही सूर्यग्रहणदेखील (Surya Grahan 2023) आहे. पण हे ग्रहण (Surya Grahan 2023 Date) भारतात दिसणार नसल्याने सुतक लागणार नाही.
सकाळची वेळ - 05.51 वाजेपासून - 07.28 वाजेपर्यंत (19 मे 2023)
दुपारचा मुहूर्त - 10.43 वाजेपासून - 01.58 वाजेपर्यंत (19 मे 2023)
संध्याकाळची वेळ - 06.50 वाजेपासून - 08.12 वाजेपर्यंत (19 मे 2023)
ज्येष्ठ अमावस्या (Jyeshtha Shani Jayanti 2023) तिथी 18 मे 2023 ला रात्री 09.42 वाजता सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी 19 मे 2023 ला रात्री 9.22 वाजेपर्यंत अमावस्या तिथी असणार आहे. उदयतिथीनुसार 19 मे रोजी शनिदेवाची जयंती साजरी केली जाणार आहे. धार्मिक ग्रथांनुसार या दिवशी सूर्य आणि सावलीच्या संयोगामुळे शनिदेवाचा जन्म झाला.
सकाळची वेळ - 07.11 वाजेपासून - 10.35 वाजेपर्यंत (19 मे 2023)
दुपारचा मुहूर्त - 12.18 वाजेपासून - 02.00 वाजेपर्यंत (19 मे 2023)
संध्याकाळची वेळ - 05.25 वाजेपासून - 07.07 वाजेपर्यंत (19 मे 2023)
वैशाख अमावस्येला ब्रह्म मुहूर्तावर उठून आंघोळ करा. त्यानंतर पूजेची तयारी करा.
मंदिरात जाऊन शनिदेवांच्या मूर्तीवर तेल, फुलं आणि प्रसाद अर्पण करा.
उडदाची डाळ आणि काळे तीळ शनिदेवांना अर्पण करा.
मोहरीच्या तेलाचा दिवा लावून शनि चालिसेचं पठण करुन आरती करा.
गरीबांना दान करा.
1. बीज मंत्र-
ॐ शं शनैश्चराय नम:
2. शनि का वेदोक्त मंत्र-
ॐ शमाग्निभि: करच्छन्न: स्तपंत सूर्य शंवातोवा त्वरपा अपास्निधा:
3. श्री शनि व्यासविरचित मंत्र-
ॐ नीलांजन समाभासम्। रविपुत्रम यमाग्रजम्।
छाया मार्तण्डसंभूतम। तम् नमामि शनैश्चरम्।।
4. शनिचर पुराणोक्त मंत्र-
सूर्यपुत्रो दीर्घेदेही विशालाक्ष: शिवप्रिय: द
मंदचार प्रसन्नात्मा पीडां हरतु मे शनि:
5. शनि स्तोत्र-
नमस्ते कोणसंस्थाचं पिंगलाय नमो एक स्तुते
नमस्ते बभ्रूरूपाय कृष्णाय च नमो ए स्तुत
नमस्ते रौद्रदेहाय नमस्ते चांतकाय च
नमस्ते यमसंज्ञाय नमस्ते सौरये विभो
नमस्ते मंदसज्ञाय शनैश्चर नमो ए स्तुते
प्रसाद कुरू देवेश दिनस्य प्रणतस्य च
कोषस्थह्म पिंगलो बभ्रूकृष्णौ रौदोए न्तको यम:
सौरी शनैश्चरो मंद: पिप्लदेन संस्तुत:
एतानि दश नामामी प्रातरुत्थाय ए पठेत्
शनैश्चरकृता पीडा न कदचित् भविष्यति
6. तंत्रोक्त मंत्र -
ॐ प्रां. प्रीं. प्रौ. स: शनैश्चराय नम:।
शनिदेव हे सूर्यदेव आणि छायादेवी यांचं पुत्र असून यम आणि यमुना त्यांचे भाऊ बहीण आहेत. शनि जयंतीला विधीवत पूजा करू न साडेसाती, अडीचकी आणि महादशेच्या अशुभ कमी करता येतो. त्यामुळे शनि जयंतीला विधीवत पूजा करणे शुभ मानले जाते.
या दिवशी मंत्रोच्चार, गरजूंना दान, असहाय्य व्यक्तीला मदत केल्याने शनिदेवाच्या साडेसातीच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते, शास्त्रात सांगण्यात आलं आहे. शनि जयंतीच्या दिवशी गरीब व्यक्तीला अन्नदान केल्याने खूप शुभ फळ मिळते.
करिअर आणि व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी शनि जयंतीच्या दिवशी पिंपळ्याचा झाडाखाली मोहरीच्या तेलाचे नऊ दिवे लावावेत.
मुलांचं सुख मिळवण्यासाठी शनि जयंतीच्या दिवशी शनिद मंदिरात शनिदेवाला जल अर्पण करा. त्याशिवाय पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी काळ्या तिळाची माळ अर्पण करा. त्यानंतर शनीच्या मंत्रांचा जप करा.
कुंडलीतील शनिदोष दूर करण्यासाठी गंगेत स्नान केल्यानंतर दान करा.