Shani-rahu Gochar : ज्योतिषशास्त्रात, एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये शनी देव सर्वात संथ गतीने त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. शनिदेव लोकांना त्यांच्या कर्मानुसार शुभ किंवा अशुभ फळ देतो. अशा परिस्थितीत, शनीच्या राशी किंवा राशीतील बदलाचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होतो.
सध्या शनी स्वतःच्या राशीत कुंभ राशीत आहे. 15 मार्च रोजी शनीने शतभिषा नक्षत्रात प्रवेश केला आहे. 17 ऑक्टोबर 2023 पर्यंत शनी या नक्षत्रात राहणार आहे. शतभिषा नक्षत्राचा स्वामी राहू आहे. अशा स्थितीत शनी आणि राहूच्या या संयोगामुळे अनेक राशींच्या समस्या वाढण्याची शक्यता आहे. शतभिषा नक्षत्राच्या पहिल्या चरणात शनि असल्यामुळे कोणत्या राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागणार आहे, याची माहिती घेऊया.
कर्क राशीच्या लोकांसाठी शनिचा शतभिषा नक्षत्रात प्रवेश लाभदायक ठरणार नाहीये. या राशीच्या लोकांनी 17 ऑक्टोबरपर्यंत थोडं सावध राहण्याची गरज आहे. व्यवसायात जास्त पैसे गुंतवणे टाळा. त्याचसोबत आरोग्याबाबत थोडे सावध राहण्याची गरज आहे. अनावश्यक खर्चामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. नोकरदार लोकांनाही कामाच्या ठिकाणी काळजी घ्यावी लागणार आहे. लव्ह लाईफमध्येही काही अडचणी येण्याची शक्यता आहे.
शतभिषा नक्षत्रात शनीचा प्रवेश वृश्चिक राशीच्या लोकांसाठीही लाभदायक ठरणार नाही. या राशीच्या लोकांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरं जावं लागणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे शत्रू तुम्हाला पराभूत करण्यासाठी नवीन मार्ग शोधतील. जे लोक चुकीच्या मार्गाने पैसे कमवत आहेत. त्यांनी सावधगिरीने पुढे जावं. महत्त्वाच्या नातेसंबंधही बिघडू शकतात. यावेळी कोणाकडूनही कर्ज घेऊ नये.
शनीने राहूच्या नक्षत्रात प्रवेश केल्याने या राशींच्या अडचणी वाढू शकतात. 17 ऑक्टोबरपर्यंत या राशीच्या लोकांनी थोडे अधिक सावध राहणं आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचे निर्णय घेणे टाळा, कारण भविष्यात त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. या काळात तुम्हाला कर्ज घेण्याची गरज भासू शकते. जोडीदारासोबत काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो. तब्येतीवर आणखी खर्च होऊ शकतो. अनावश्यक खर्चामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )