Shanishchari Amavasya Upay : शनिश्चरी अमावस्येला करा हा छोटासा उपाय! आयुष्यात कधी होणार नाही पैशांची कमी

Shanishchari Amavasya 2023 Date : जर तुमच्या आयुष्यात पैशांची चणचण जाणवतं असेल तर या शनिश्वरी अमावस्याला करा काही उपाय. तुम्हाला कधीही पैशांची कमी जाणवणार नाही. कधी आहे शनिश्वरी अमावस्या जाणून घ्या. 

Updated: Jan 19, 2023, 01:01 PM IST
Shanishchari Amavasya Upay : शनिश्चरी अमावस्येला करा हा छोटासा उपाय! आयुष्यात कधी होणार नाही पैशांची कमी title=
Shanishchari Amavasya 2023 Date time 21 January 2023 Saturday shani amavasya 2023 upay for money marathi news

Shanishchari Amavasya Upay : हिंदू धर्मात जसं पौर्णिमेला महत्त्व आहे तसाच अमावस्यालाही विशेष महत्त्वं आहे. अमावस्याच्या दिवशी बाळुमामाच्या (balumama) मठात पूजाअर्चा केल्यास तुमचे सगळ्या इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. नवीन वर्षात येणाऱ्या शनिवारी म्हणजे 21 जानेवारी 2023 रोजी अमावस्या आहे. हिंदू धर्मात मौनी अमावस्या आणि शनिश्चरी अमावस्या या दोन्हींना विशेष महत्त्व आहे. यंदा माघ महिन्यातील मौनी अमावस्या शनिवारी येत आहे. या कारणास्तव ही अमावस्या अनेक अर्थांनी विशेष आहे. काही दिवसांपूर्वी शनीने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. यामुळे शनिश्चरी अमावस्या शनीची कृपा मिळवण्यासाठी आणि अनेक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी खास आहे. 

शनिश्चरी अमावस्या पूजेचा मुहूर्त 

माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी शनिवार, 21 जानेवारी रोजी सकाळी 06:17 पासून सुरू होईल आणि रविवार, 22 जानेवारी रोजी पहाटे 02:22 पर्यंत चालेल. उदयतिथीनुसार मौनी अमावस्या किंवा शनिश्चरी अमावस्या 21 जानेवारीला असेल. मौनी अमावस्येच्या दिवशी स्नान, दान, तर्पण आणि पूजा करा. (Shanishchari Amavasya 2023 Date time 21 January 2023 Saturday shani amavasya 2023 upay for money marathi news)

गंगेत स्नान करा 

मौनी अमावस्या किंवा शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी गंगेत स्नान करणे फार पुण्याचं मानलं जातं. या दिवशी गंगेत स्नान केल्याने अमृत स्नान करण्याइतकं पुण्य मिळते. विशेषत: ज्यांना शनीची महादशा सुरु आहे त्यांनी शनिवारी गंगा स्नान केलं पाहिजे, असं शास्त्रात सांगितलं जातं. या स्नानमुळे शनिदेवाची अपार कृपा होते आणि सर्व संकटं दूर होतात. 

शनिश्चरी अमावस्याला हे उपाय करा

- शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी स्नान करून दानधर्म करा. असं केल्यामुळे तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी नांदते.  

- ज्यांना पितृदोष आहे त्यांनी शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध आणि तर्पण करावे. असं केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो. शिवाय घरात सुख, शांती, प्रगती आणि समृद्धी नांदते. जर काही कारणामुळे तुम्हाला पवित्र नदीकाठी जाऊन श्राद्ध करता येतं नसेल त्या लोकांनी घरीच तांदळाची खीर तयार करावी आणि हवनमध्ये तिचा भोग लावावा. 

- शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा अवश्य लावा, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आला आहे. शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी आणि आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर ठरतो. याशिवाय प्रगतीत येणारे अडथळेही हा उपाय केल्यामुळे दूर होतो. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)