Navratri 2023 : आज नवरात्रीची सहावी माळ! कात्यायनी देवी करते सर्व दु:खांचा नाश, जाणून घ्या पूजाविधी, मंत्र व स्वरूप

Navratri 6th Day 2023 : आज शारदीय नवरात्रीची सहावी माळ आहे. आज दु:खांचा नाश करणारी कात्यायनी देवीची पूजा करण्यात येणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Oct 20, 2023, 12:10 AM IST
Navratri 2023 : आज नवरात्रीची सहावी माळ! कात्यायनी देवी करते सर्व दु:खांचा नाश, जाणून घ्या पूजाविधी, मंत्र व स्वरूप title=
shardiya navratri 2023 6th day mata katyayani puja vidhi aarti mantra and bhog and mahaupay and navratri 6th day colors green friday

Shardiya Navratri 6th Day 2023 : शारदीय नवरात्रीला (Shardiya Navratri 2022) सुरुवात झाली आहे. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची (mata katyayani) पूजा करण्याचा नियम आहे. कात्यायनी देवी ही सिंहावर विराजमान असून चार हात तिला आहे. ज्यात कमळ, त्रिशूल, तलवार आणि ढाल आहे. उत्तर भारतातील यूपी, बिहार आणि झारखंडमध्ये या देवीला छठ मैया म्हणूनही पूजा केली जाते. (shardiya navratri 2023 6th day mata katyayani puja vidhi aarti mantra and bhog and mahaupay and navratri 6th day colors green friday)

शुक्रवारचा रंग आणि सहावी माळ

शुक्रवारचा रंग हा हिरवा आहे. सहावी माळ ही कर्दळीच्या फुलांची असते.

कात्यायनी देवींचे रूप 

मनमोहक असं या देवीचं रुप असून तिच्या चेहऱ्यावर सोन्यासारखं तेज आहे. चार हातामध्ये मातेने तलवार, कमळ, अभय मुद्रा आणि वर मुद्रा धारण केली आहे. कात्यायनी देवीला राखाडी रंग प्रिय आहे. पौराणिक कथांनुसार, महर्षी कात्यायन यांच्या तपश्चर्येनंतर माता कात्यायनी त्यांच्या कन्या ही देवी जन्माला आली होती. या रूपात माता दुर्गेने महिषासुराचा वध करून देव आणि मानवांना त्याच्या दहशतीतून मुक्त केलं अशी आख्यायिका आहे.

देवी कात्यायनी पूजा विधी

नवरात्रोत्सवाच्या सहाव्या दिवशी सर्वप्रथम स्नान आणि ध्यानानंतर कलश पूजन करा. त्यानंतर माता दुर्गा आणि माता कात्यायनी यांची पूजा संपन्न करा. पूजा करताना मातेचं स्मरण करा. त्यानंतर देवीला कुमकुम, अक्षता, फुलांसह सोळा अलंकार अर्पण करा. त्यानंतर, देवीला आवडणारं मध आणि मिठाईचं नैवेद्य अपर्ण करा. आता तुपाचा दिवा लावून देवीची आरती करा. आरतीपूर्वी दुर्गा चालिसा आणि दुर्गा सप्तशती नक्की वाचा. 

 या मंत्रांचा जप करा

1. या देवी सर्वभूतेषु माँ कात्यायनी रूपेण संस्थिता।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।

2. चंद्र हासोज्जवलकरा शार्दूलवर वाहना|

कात्यायनी शुभंदद्या देवी दानवघातिनि||

देवी कात्यायनीची आरती

जय-जय अम्बे जय कात्यायनी

जय जगमाता जग की महारानी

बैजनाथ स्थान तुम्हारा

वहा वरदाती नाम पुकारा

कई नाम है कई धाम है

यह स्थान भी तो सुखधाम है

हर मंदिर में ज्योत तुम्हारी

कही योगेश्वरी महिमा न्यारी

हर जगह उत्सव होते रहते

हर मंदिर में भगत हैं कहते

कत्यानी रक्षक काया की

ग्रंथि काटे मोह माया की

झूठे मोह से छुडाने वाली

अपना नाम जपाने वाली

बृहस्पतिवार को पूजा करिए

ध्यान कात्यायनी का धरिए

हर संकट को दूर करेगी

भंडारे भरपूर करेगी

जो भी मां को 'चमन' पुकारे

कात्यायनी सब कष्ट निवारे।।

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)