Dhanteras Shash Mahapurush Rajyog : धनत्रयोदशी म्हणजे कुबेराची पूजा याचाच अर्थ पैसा, संपत्तीचा पूजा करण्यात येते. अशात धनत्रयोदशी तीन राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. कर्माचा दाता शनिदेव याची कृपा या राशींवर बरसणार आहे. शनिदेव हा एका राशीत अडीच वर्ष स्थायिक असतो. तर त्याला एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी 30 वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे शनिची महादशा आणि साडेसाती ही व्यक्तींवर परिणाम करते. पण सध्या शनिदेव स्वगृही कुंभ राशीत विराजमान आहे. त्यामुळे त्याचा या स्थितीमुळे प्रभावशाली असा शश महापुरुष राजयोगाची निर्मिती झालीय. हा राजयोग 2025 पर्यंत काही राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. (shash mahapurush rajyog on Dhanteras shani gochar after 30 years in diwali 3 zodiac sign Increased bank balance)
या राशीच्या लोकांसाठी धनत्रयोदशी शुभ असणार आहे. यावेळी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. तुमचं मन अध्यात्माकडे वळणार आहे. धार्मिक कार्यक्रमात रुची वाढणार आहे. तुम्हाला तुमच्या मुलांकडूनही काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. करिअरबद्दल बोलायचं झालं तर या काळात नोकरीच्या अनेक चांगल्या संधी मिळणार आहे. तुम्ही नोकरी करत असाल तर पदोन्नती किंवा पगार होणार आहे. व्यवसायातही चांगला लाभ होण्याची चिन्हे आहेत. शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कमविण्याची संधी आहे. आरोग्य चांगले राहणार असून तुम्ही मानसिकदृष्ट्याही मजबूत होणार आहे.
धनत्रयोदशी या राशीच्या लोकांसाठी चढत्या घरात शनिची उपस्थिती शुभ चिन्हे घेऊन येणार आहे. शश राजयोग तुम्हाला यश आणि प्रगतीचा काळ असणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होणार आहे. आत्मविश्वास वाढणार आहे. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या सर्व कामात यशस्वी होणार आहात. कुटुंबात काही समस्या असल्यास, आता त्याचे निराकरण होणार आहे. जर तुम्ही अभ्यासासाठी परदेशात जाण्याचे स्वप्न पाहत असाल तर यावेळी तुमच्यासाठी चांगल्या संधी येणार आहे. नोकरदार लोकांसाठी हा काळ बोनस आणि पदोन्नतीच्या असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. मानसिकदृष्ट्याही तुम्ही मजबूत राहणार आहात.
या राशीच्या लोकांसाठीही शश राजयोग फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही करत असलेल्या कामात यश मिळणार आहे. काही अडचण येत असेल तर त्यातून बाहेर पडणार आहात. तुमच्या करिअरमध्ये प्रगती होणार असून कदाचित तुम्हाला नवीन पदही मिळणार आहे. पगार वाढल्याने तुम्हाला काही मोठी जबाबदारी घेण्याची संधी मिळणार आहे. तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे. या काळात तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळणार आहे. जोडीदारासोबतचे नाते घट्ट होणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.