पायातील Shoe ठरवतात यशाचा मार्ग, असे बुट असल्यास लगेच बदला

जाणून घ्या कोणत्या प्रकारची बुट वापरायला हवीत

Updated: Sep 11, 2022, 06:20 PM IST
पायातील Shoe ठरवतात यशाचा मार्ग, असे बुट असल्यास लगेच बदला title=

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार तुमच्या नशिबाचा संबंध तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीशी असतो. तुम्ही कुठे राहता, काय करता आणि स्वतःला कसे ठेवता? या गोष्टींचा तुमच्यावर खूप परिणाम होतो. नोकरीत कष्ट करूनही यश मिळत नाही, असे अनेकांच्या आयुष्यात घडते. उलट तुमचे ज्युनियर तुमच्यापेक्षा जास्त प्रगती करू लागतात आणि तुम्ही तिथेच उभे राहून बघत राहतात. तुमच्या मेहनतीत काही कमतरता आहे असं नाही, तर कधी कधी वास्तूतील दोषांमुळेही होतं. तुम्हाला माहिती आहे का वास्तुशास्त्रानुसार तुमच्या प्रगतीतील अडथळ्याचा संबंध तुमच्या पायात असलेल्या बुटांशी आहे. आश्चर्यचकित होण्याची आवश्यकता नाही, बुट ही शनि ग्रहाशी संबंधित आहेत. ज्यांच्या जीवनात शनीची हालचाल योग्य नाही. त्यांच्या आयुष्यात अनेक अडथळे येतात. तुम्हाला तुमचे नशीब उजळायचे असेल तर बुटांकडे विशेष लक्ष द्या. (Astro Tips for Shoes and Slippers) 

आणखी वाचा : अबब ! 10 वर्षे हनीमूनवर निघालेलं जोडपं जगतंय 'या' गोष्टीवर, कारण वाचून व्हाल हैराण

वास्तुशास्त्राच्या तज्ज्ञांचे मत आहे की, बुट कधीही घराच्या दारात किंवा बाजूला ठेवू नयेत. असे केल्याने घराच्या समृद्धीला बाधा येते आणि स्वतःच्या यशातही बाधा येते. लक्षात ठेवा, शूज चुकूनही बेडरूममध्ये ठेवू नयेत. वास्तुशास्त्रानुसार शूज घराच्या दक्षिण-पश्चिम किंवा पश्चिम दिशेला ठेवावेत.

आणखी वाचा : राखी सावंतच्या 'तसल्या' कपड्यांवर बॉयफ्रेंड आदिल संतापला, अभिनेत्रीला वाटते भीती?

वास्तुशास्त्राचे तज्ज्ञ सांगतात की जेव्हाही तुम्ही शूज खरेदी कराल तेव्हा त्याच्या रंगांवर विशेष लक्ष द्या. फॅशनच्या या युगात पिवळ्या रंगाचे शूज आणि चप्पल न घालण्याचा प्रयत्न करा, कारण पिवळा रंग गुरू ग्रहाचा मानला जातो. यामुळे कुंडलीत गुरूचे स्थान अशुभ होते.

Miyan Biwi Aur Banana: शॉर्ट फिल्म निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल, भगवान जगन्नाथांवर विनोद केल्याचा आरोप

जर तुम्हाला नोकरीमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर निळ्या रंगाची बुट घालण्याचा प्रयत्न करा. यामुळे नोकरीत प्रगती होईल, बुट घालताना स्वच्छ ठेवा. घाणेरडे किंवा फाटलेली बुट कधीही घालू नका. जेवताना बुट आणि चप्पल काढायला विसरू नका. जर तुम्ही वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत असाल तर काळे शूज परिधान केल्याने भाग्यरेषा उजळतील.

आणखी वाचा : वैवाहिक आयुष्यात दोनवेळा अपयश तरी..., श्वेता तिवारी लेकीला; म्हणाली 'तू हेच कर...'

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)