14 वर्षानंतर श्रावण महिन्यात शनैश्चरी अमावास्येचा योग, उपाय करून शनिचा प्रभाव कमी करण्याची संधी

27 ऑगस्ट 2022 रोजी (शनिवार) श्रावण महिना संपत आहे. योगायोगाने श्रावणातील शेवटच्या अमावस्येला शनिवार आला आहे.

Updated: Aug 24, 2022, 02:11 PM IST
14 वर्षानंतर श्रावण महिन्यात शनैश्चरी अमावास्येचा योग, उपाय करून शनिचा प्रभाव कमी करण्याची संधी title=

Shani Amavasya 2022 Special Yog: 27 ऑगस्ट 2022 रोजी (शनिवार) श्रावण महिना संपत आहे. योगायोगाने श्रावणातील शेवटच्या अमावस्येला शनिवार आला आहे. या शनिवार आणि अमावस्या एकत्र आल्याने शनैश्चरी अमावास्या संबोधलं जातं. जवळपास 14 वर्षानंतर श्रावण महिन्यातील अमावस्येला हा योग तयार झाला आहे. यानंतर दोन वर्षानंतर 2025 मध्ये हा योग असणार आहे. हिंदू धर्मात श्रावणी अमावस्येला महत्त्व आहे. हा महिना व्रतवैकल्यांचा असून शेवट अमावस्येनं होते. या दिवशी शनिवार आल्याने ज्योतिष शास्त्रानुसार महत्त्व वाढलं आहे. त्याचबरोबर शनिदेव या दिवशी आपली स्व-रास असलेल्या मकर राशीत विराजमान होतील. त्यामुळे हा दिवस खास असणार आहे.

पंचांगानुसार अमावास्या 26 ऑगस्ट 2022 रोजी (शुक्रवार)  दुपारी 12 वाजून 23 मिनिटांनी सुरु होणार आहे आणि 27 ऑगस्ट 2022 (शनिवार) दुपारी 1 वाजून 46 मिनिटांनी संपणार आहे. त्यामुळे शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी शनिवारी दुपारी 1 वाजून 46 पर्यंत उपाय करू शकता. ज्या राशींवर शनिची साडेसाती आणि अडीचकी सुरु आहे, त्यांनी शनि अमावस्येच्या दिवशी उपाय अवश्य करावेत. असे केल्याने शनि देवांचा अशुभ प्रभाव कमी होईल. 

सध्या धनु, मकर आणि कुंभ राशीत शनिची साडेसाती सुरू आहे. त्याचबरोबर मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांवर अडीचकीचा प्रभाव आहे. शनि या काळात शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास देतात.

शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी उपाय

- शनैश्चरी अमावास्येच्या दिवशी शनिदेवांना मोहरीचे तेल अर्पण करा. तसेच काळे तीळ, काळे उडीद, काळे वस्त्र दान करावे.

- शनैश्चरी अमावास्येच्या एक दिवस आधी म्हणजे शुक्रवारी काळी उडीद डाळ काळ्या कपड्यात बांधून ठेवा. मग ही पोटली डोक्याजवळ ठेवा आणि झोपा. दुसऱ्या दिवशी अमावास्येला शनि मंदिरात ही पोटली ठेवा. यामुळे शनिचा अशुभ प्रभाव कमी होईल आणि जीवनात सुख-समृद्धी येईल.

- शनिच्या प्रकोपापासून मुक्ती मिळवण्यासाठी भांड्यात मोहरीचे तेल घेऊन अमावास्येच्या दिवशी एक नाणे टाकावे. त्यात तुमचा चेहरा बघा आणि शनि मंदिरात तेलाचं भांड ठेवा. तुम्ही कोणत्याही गरजूंना दान करू शकता.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)