सूर्य-शुक्र युतीमुळे शुभ योग, ऑगस्टमधील 'या' तारखेपासून चार राशींना 'अच्छे दिन'

ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि शुक्र ग्रहाचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. सूर्य हा नेतृत्वकारक ग्रह असून यशासी निगडीत आहे. तर शुक्र हा ग्रह संपत्ती, भौतिक सुख आणि प्रेमाचा कारक ग्रह आहे. 

Updated: Aug 4, 2022, 02:29 PM IST
सूर्य-शुक्र युतीमुळे शुभ योग, ऑगस्टमधील 'या' तारखेपासून चार राशींना 'अच्छे दिन' title=

Shukra and Surya Gochar in Singh Rshi 2022: ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि शुक्र ग्रहाचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. सूर्य हा नेतृत्वकारक ग्रह असून यशासी निगडीत आहे. तर शुक्र हा ग्रह संपत्ती, भौतिक सुख आणि प्रेमाचा कारक ग्रह आहे. तसेच सूर्य आणि शुक्र हे ग्रह मित्र ग्रह असल्याचं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे. त्यामुळे या दोन ग्रहांच्या युतीने शुभ योग तयार होतो. आता गोचर कुंडलीनुसार सूर्य आणि शुक्र ग्रह या महिन्यात सिंह राशीत एकत्र येणार आहेत. या युतीचा सर्व 12 राशींवर चांगला प्रभाव पडेल. सूर्य 17 ऑगस्ट 2022 रोजी सिंह राशीत प्रवेश करणार आहे. तर शुक्र 31 ऑगस्टला या राशीत येणार आहे. त्यामुळे 31 ऑगस्टपासून सूर्य-शुक्र युती तयार होईल. ही युती 15 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. हे 15 दिवस चार राशींसाठी फलदायी ठरतील. चला तर जाणून घेऊयात चार भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.

वृषभ : रवि शुक्राची युती वृषभ राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरेल. या राशींच्या लोकांना जीवनात अपेक्षित यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. काही महत्त्वाच्या कामात यश मिळाल्यास आनंदी व्हाल. उच्च शिक्षणासाठी तुम्ही तुमच्या आवडीच्या संस्थेत प्रवेश घेऊ शकाल.

मिथुन : मिथुन राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन आनंदी राहील. जे लोक वकृत्वाशी संबंधित कामात आहेत, त्यांना यश मिळेल. उत्पन्नाची साधनं वाढतील. विवाहित लोकांच्या जीवनात आनंद राहील.

कर्क : कर्क राशीच्या लोकांना या काळात आर्थिक लाभ होईल. नोकरदारांचा पगार वाढेल, व्यावसायिकांना भरपूर पैसा मिळेल. तुम्हाला अनेक स्त्रोतांमधून कमाईचा आनंद मिळेल. प्रत्येक पावलावर नशीब तुमची साथ देईल, त्यामुळे सर्व कामे सहज पूर्ण होतील.

कुंभ : रवि शुक्राची युती कुंभ राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरेल. वैवाहिक जीवनात आनंद आणि प्रेम वाढेल. जे भागीदारीच्या कामात आहेत, त्यांना फायदा होईल. गुंतवणुकीसाठी चांगली वेळ आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. लाभदायक प्रवास होईल.