पधारो सा! IRCTC नं आणलंय राजेशाही थाटातलं राजस्थानचं टूर पॅकेज; पाहा A to Z माहिती

IRCTC Rajasthan Tour Package: Indian Railway च्या अख्तयारित येणाऱ्या आयआरसीटीसीकडून राजस्थानसाठीची एक सुरेख सफर आखण्यात आली आहे. अनुभवा हे रॉयल राज्य, रॉयल पद्धतीनं...   

सायली पाटील | Updated: Nov 21, 2024, 02:59 PM IST
पधारो सा! IRCTC नं आणलंय राजेशाही थाटातलं राजस्थानचं टूर पॅकेज; पाहा A to Z माहिती title=
indian railway irctc Rajasthan Tour Package details price

IRCTC Rajasthan Tour Package: वर्षभर कामाच्या व्यापामुळं भटकंतीसाठी वेळ मिळाला नसेल आणि वर्षाचा शेवट तरी किमान एखाद्या नव्या ठिकाणी भेट देण्यानं करायचा असेल तर, राजस्थान तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. डिसेंबर महिन्यातील थंडी, कमाल वातावरण आणि एक वेगळीच सकारात्मकता अनुभवायची असेल, तर आयआरसीटीसी, भारतीय रेल्वे अशा सर्वच मंडळींसाठी एक खास टूर पॅकेज सादर करत आहे. 

कुटुंबासह तुम्ही या खास सहलीला येऊन राजेशाही थाटात सुट्टीचा आनंद घेऊ शकता. आयआरसीटीसीनं यावेळी राजस्थानची सफर घडवण्यासाठीचा बेत आखलाय. बंगळुरू इथून ही सहल 9 डिसेंबरपासून सुरू होणार असून, 6 रात्री आणि 7 दिवसांसाठीची ही सहल असेल. 

आयआरसीटीसीच्या वतीनं आखण्यात आलेल्या या खास सहलीमध्ये राजस्थानातील अजमेर, बीकानेर, जयपुर, जैसलमेर, जोधपुर आणि पुष्कर यांसारखी ठिकाणं फिरू शकणार आहेत. विमानप्रवास आणि त्यानंतर राजस्थानात पोहोचताच तिथं फिरण्यासाठीच्या वाहनासी सोय या पॅकेजमध्ये असेल. 

तुम्ही एकट्यानं या सहलीला जायचा बेत आखत असाल, तर त्यासाठी 51900 रुपये खर्च करावे लागतील. दोन व्यक्ती या सहलीसाठी जाणार असाल, तर माणसी खर्च असेल 40550 रुपये आणि तीन व्यक्तींसाठी हीच माणसी रक्कम असेल 38500 रुपये. सहलीमध्ये तुमच्यासमवेत लहान मुलं असल्यास त्यांच्यासाठीचा खर्च असेल 35750 रुपये. 

हेसुद्धा वाचा : नजर जाईल तिथं बर्फच फर्फ... PHOTOS पाहून म्हणाल 'जन्नतों के दरमियां ये कश्मीर है...' 

आयआरसीटीसीच्या या पॅकेजला ROYAL RAJASTHAN EX BENGALURU असं नाव देण्यात आलं असून, गुगलवर तुम्हाला यासंदर्भातील माहिती मिळेल. बंगळुरू- जयपूर- बंगळुरू अशा प्रवासातील खर्च पॅकेजचाच भाग असेल. याशिवाय नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाचा समावेशही पॅकेजमध्येच असणार आहे. दुपारच्या खाण्याची सोय तुम्हाला करावी लागणाल असून, स्थानिक प्रवासादरम्यान एसी कोच बसची आरामदायी सुविधा असेल. काय मग, कधी जाताय शाही राजस्थान अनुभवायला?